Home आपला जिल्हा Breaking News किमयागार गौरव हरपला !, मूल शहरातील नागरीकांनी व्यक्त केल्या भावना

किमयागार गौरव हरपला !, मूल शहरातील नागरीकांनी व्यक्त केल्या भावना

94

मूल : येथील गौरव शामकुळे (वय अंदाजे 30) यांचे आज रविवार ला सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.संवर्धनासाठी नेहमी तत्पर असलेला आणि यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणारा यांसह विविध क्षेत्रांत कार्य होते. त्यांच्या निधनानंतर ‘मूल शहरातील किमयागार, मार्गदर्शक हरपला आहे,’ अशा भावना मूल शहरांतून व्यक्त होत आहेत.
सामाजिक बांधीलकीच्या नात्यातून सुरू करण्यात आलेल्या विविध कार्यातून वटवृक्ष करण्यामध्ये त्यांचे विशेष योगदान होते.

मुल नगरीतील समाजाभिमुख युवा गौरव शामकुळे यांचे निधन आज उमा नदीच्या तिरावार 3.30 हजारो हजारो मित्रपरीवारच्या,नातेवाईकांच्या उपस्थितीत अंतीमसंस्कार करण्यात आले. 
– सामाजिक कार्यक्षेत्रातील एक स्मित हास्य हरपले
मुल येथील गौरव शामकुळे यांचे आज अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने मुल नगरी एक समाजाभिमुख, हसमुख आणि दिलखुलास व्यक्तिमत्व गमावले आहे. गौरव शामकुळे हे होतकरू आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे तरुण कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात निर्माण व्हावी म्हणून ते नियमितपणे सहकाऱ्यांसह विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत असत.
त्यांच्या स्वच्छता मित्र या ओळखीमुळे ते तरुणांमध्ये प्रेरणास्थान ठरले होते. यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम, जनजागृती मोहिमा आणि चालू घडामोडी ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सातत्याने केले. समाजातील सकारात्मक बदलासाठी झटणारा हा तरुण अचानक गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..
गौरव शामकुळे यांच्या निधनामुळे समाजकारण आणि स्वच्छता मोहिमेला वाहिलेल्या एका समर्पित कार्यकर्त्याची उणीव भासणार आहे. शामकुळे
परिवारावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगात त्यांना सावरण्याची शक्ती देव करो, अशी सर्व स्तरातून प्रार्थना व्यक्त होत आहे…

अत्यंत दुःखद घटना
मूल चा स्वछता दूत हरपला.
गौरव इतक्या लवकर आमच्यामधू निघून जाशील हे स्वप्नातही बघितलं नाही. तुझ्या अशा अचानक जाण्याने मूलच नव्हे तर संपूर्ण तालुका हळहळत आहे.
तुझ्या कार्याची दखल घेत माजी मंत्री, विद्यमान आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तुझ्या सह तुझ्या सर्व सहकार्याना नवीन सायकली दिल्या ह्या आठवणी कायम स्मरणात राहतील समाजसेवी स्वछतादुता अखेरचा सलाम, भावपूर्ण श्रद्धांजली! अशोक येरमे सर

अतिशय दुःखद बातमी :
मुल नगरीतील होतकरू, सर्वसामान्य माणसासाठी कार्य करणारा, पर्यावरण संवर्धनासाठी स्वतःला वाहून घेणारा, यूट्यूब चैनल च्या माध्यमातून सामाजिक चालू घडामोडी व कार्यक्रम या विविध बाबी ग्रामीण भागातील व शहरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणारा, सकाळी वेळात वेळ काढून सहकारी मित्रांना सोबत घेऊन ठीक ठिकाणी स्वच्छतेचे कार्य करणारा , स्वच्छता मित्र, हसमुख ,दिलखुलास व्यक्तिमत्व गौरव शामकुळे आज आपल्यात राहिलेला नाही. अल्पशा आजाराने गौरव चे आज सकाळी निधन झाले. एक स्मित हास्य हरपला. अशा युवा कार्यकर्त्याच्या जाण्यामुळे समाजाची हानी झालेली आहे. शामकुळे परिवार व त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करून हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏 अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा चंद्रपूर च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏