मूल : १६ ऑक्टोंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूर च्या पवित्र दिक्षाभुमीवर ३ लाख लोकांना बौध्द धम्माची दीक्षा दिली, त्या निमित्ताने भारतीय बौध्द माहासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव आंबेडकर यांनी १६ आक्टोबर हा राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर केला आहे त्या निमित्ताने भारतीय बौध्द माहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व च्या वतीने दोन दिवशीय १४ व १५ ला समता सैनिक दलाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व १६ ला पवित्र दिक्षाभुमीवर समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना व पथसंचलन च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व च्या वतीने नुकतेच रामलीला भवन येथे
समता सैनिक दलाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन डॉ राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौध्द माहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व व विजया रामटेके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उद्घाटनीय कार्यक्रमाला घनश्याम भडके कोषाध्यक्ष, मधुकर बनकर, प्रा. जगदीश सेमसकर, उषा दुर्गे सरचिटणीस, विजय दुर्गे जिल्हा सचिव, जि एम बाबळे शहर अध्यक्ष, अशोक रामटेके तालुका अध्यक्ष मुल वनमाला रामटेके, यशवंत देवगडे, बबन रंगारी, सरला रगारी व मुख्य मार्गदर्शक अनिल मेश्राम मेजर जनरल सिध्दार्थ बाबोळकर, सहदेव रामटेके सरचिटणीस मुल उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १६ आक्टोबर १९५६ ला मुलांच्या गेस्ट हाऊस ला थांबले होते व थोडी विश्रांती घेतली होती अशा पवित्र रेस्ट हाऊस ला भारतीय बौध्दमाहासभेच्या वतिने
सायंकाळी पाच वाजता मुख्य अभियंता व सायक अभियंता व जिल्हा अध्यक्ष डॉ राजपाल खोब्रागडे व सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
१६ आक्टोबर ला सकाळी नव वाजता चंद्रपूर च्या छोठु भाई पटेल विद्यालय पासून तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पर्यंत समता सैनिक दलाचे पथसंचलन करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालापुष्पहार अर्पण करून अभिवादन करून भिमस्मरण व भीम स्तुती घेण्यात आली, व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर पवित्र दिक्षा भुमी पर्यंत अस्थिकलश सोबत समता सैनिक दलाचे पथसंचलन करण्यात आले. दिक्षा भूमी ला मानवंदना देण्यात आली व भीम स्मरण भीमस्तुती घेण्यात आली व सैनिकांचे विसर्जन करण्यात आले. समता सैनिक दलाच्या शिबिराला आठही तालुक्यातील पुरुष व महिला सैनिक मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, ग्राम पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात धम्म दान देऊन व स्वता उपस्थित राहुन सहकार्य केले. (ता.प्र. )
Home आपला जिल्हा Breaking News मुल येथे ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने समता सैनिक दलाचे शिबिर...






