पुणे : ऑनलाइन आणि केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यात १४ लाख ८५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ लाख ३३ हजार ८९३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केला आहे. अद्याप काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने दि. २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान अंतिम विशेष फेरी राबविण्यात येत आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती दिली. अंतिम फेरी म्हणत शिक्षण मंडळाने अनेक फेऱ्या राबविल्या. या वेळापत्रकामुळे त्यात आणखी एका फेरीची भर पडली आहे. राज्यातील महाविद्यालयांची संख्या विचारात घेता एकूण प्रवेश क्षमता २१ लाख ५९ हजार २३२ इतकी आहे. पण, प्रत्यक्षात १४ लाख ८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग-१ (नोंदणी) आणि भाग-२ (कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम) पूर्ण करून अंतिमता सहभाग नोंदविला आहे. त्यापैकी काही विद्यार्थी अद्याप प्रवेश निश्चित करू शकलेले नाहीत. त्यांच्यासाठी सदर फेरीचे आयोजन केले असून, वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी, पालक व प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Publish on : 21/09/2025
New College registration and surrendering Quota seats will be available from 22/09/2025 at 08:00 AM to 22/09/2025 at 10:00 AM.
To increase college intake will be available from 22/09/2025 at 10:00 AM to 22/09/2025 at 12:00 PM.
New student registration and correction in Part-1 Form and filling the application Part-2 Form for will be available from 22/09/2025 at 05:00 PM to 23/09/2025 at 05:00 PM.
नवीन महाविद्यालय नोंदणी आणि कोटा जागा प्रत्यार्पित करणे २२/०९/२०२५ सकाळी ०८:०० ते २२/०९/२०२५ सकाळी १०:०० वाजेपर्यंत उपलब्ध असतील.
महाविद्यालय प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी २२/०९/२०२५ सकाळी १०:०० ते २२/०९/२०२५ दुपारी १२:०० वाजेपर्यंत उपलब्ध असतील.
नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी आणि भाग-१ फॉर्ममध्ये दुरुस्ती आणि भाग-२ साठी अर्ज फॉर्म भरण्याची सुविधा २२/०९/२०२५ सायंकाळी ०५:०० ते २३/०९/२०२५ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत उपलब्ध असेल.