Home आपला जिल्हा Breaking News मूल येथे ग्रामगीता पारायण उपक्रम

मूल येथे ग्रामगीता पारायण उपक्रम

72

मूल श्री गुरुदेव बचत गट मूलतर्फे श्रावण मासानिमित्ताने घर तेथे ग्रामगीता संदेश पोहोचविण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचार समर्पित मंडळीकडे सामुदायिक प्रार्थना आणि ग्रामगीतेतील ४१ अध्याय वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.एक घर, एक उपासक, एकदिवस, एक अध्याय, अशा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची सुरूवात श्रावण शुद्ध सप्तमी गोस्वामी तुलसीदास जयंतीला प्रा. वसंतराव ताजने यांच्या निवासस्थानी ग्रामगीतेतील सद्धर्ममंथन पंचकातील प्रथम अध्याय देवदर्शन वाचन आणि अर्थ विवेचनाने झाली. भाद्रपद कृष्ण तृतिया सत्यदेव महाराज पुण्यतिथीला या उपक्रमाचा समारोप १४ सप्टेंबरला मांडवकर निवासस्थानी पार पडला. याप्रसंगी १८ नवीन जुळलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळ सभासदांना ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामगीता अध्याय वाचन व अर्थ विवेचन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारांशी समर्पित अधिकाधिक उपासक मंडळींकडे व्हावा, या हेतूने ग्रामगीताचार्य गणेश मांडवकर, मध्यवर्ती प्रतिनिधी शरदराव सहारे, प्रा. वसंतराव ताजने, प्रा. किसनराव वासाडे, विजयराव लाडेकर, नामदेव पिजदुरकर, सितकुरा देशमुख, सुखदेव चौथाले, धनंजय गोहणे, गुरुदेव बोदलकर, चंद्रशेखर पिदुरकर, विलासराव मांडवकर, रमेश तांगडे, निलेश माथनकर, माणिकराव पाटेवार, रमेश झाडे, सुलोचना तांगडे, मंगला ताजने, उषा वासाडे, उर्मिला गोहणे, शशिकला मांडवकर, सविता पिजदुरकर, प्रभा चौथाले, कल्पना पिदुरकर, सुनंदा लाडेकर, दिपाली मांडवकर, माधुरी बोदलकर, जयश्री माथनकर यांच्या सहकार्याने पार पडला.