Home आपला जिल्हा Breaking News संत निरंकारी मिशनचे वतीने मूल येथे रक्तदान शिबिर संपन्न

संत निरंकारी मिशनचे वतीने मूल येथे रक्तदान शिबिर संपन्न

65

मूल, प्रतिनिधी.
संत निरंकारी मिशन चॅरिटेबल फौंडेशन दिल्ली शाखा मूल तर्फे संत निरंकारी सत्संग भवन मूल येथे दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रविवार रोजी(वर्ष १० वे ) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विनोद येनुरकर नगरपरिषद कार्यालय प्रशासकीय अधिकारी , व दीपक देशपांडे जेष्ठ पत्रकार तथा जागृत ग्राहक राजा या संघटनेचे नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संत निरंकारी मंडळ वारसा /नागपूर झोनचे झोनल इन्चार्ज किशन जी नागदेवे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून किशन जी माटे भद्रावती ब्रांच मुखी. तसेच दादाजी बुरांडे नलेश्वर ब्रांच मुखी.व दिलखुदास बोरकुटे चामोर्शी ब्रांच मुखी उपस्थित होते.

रक्तदान शिबीराचे आयोजक लक्ष्मण जी निकुरे ब्रांच मुखी मूल तसेच रमेश जी डांगरे सर सचिव जागृत ग्राहक राजा मूल, डॉ.अंजली साखरे रक्त संक्रमण अधिकारी गडचिरोली ,डॉ. नामदेव सोनूले चंद्रपूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

उद्घाटनपर भाषणात दीपक देशपांडे यांनी रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान असून आजच्या सर्वपित्री अमावस्येच्या पर्वावर होत असलेला हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आपल्या पूर्वजांना आदरांजली, वाहण्यासाठी घेतलेला एक यशस्वी निर्णय आहे , आणि रक्तदान केल्याने रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होऊन ते पातळ झाल्याने रक्तप्रवाह अधीक सुरळीत होण्यास मदत होते आणि आपल्या शरीरात नवी उर्जा निर्माण होते ,अन्य रोगांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदतच होते.असे प्रतिपादन केले.व आम्ही ग्राहक जागृती चे कार्य करीत असतांनाच संवाद समन्वयातून यश मिळविण्याचा प्रयत्न करतो तर इथे मिशनच्या माध्यमातून माणसाला जोडण्याचे कार्य केले जात असल्याने आपली जर गाठभेट मजबूत झाली तर आपण समाजाला नवी दिशा देण्यात सहजगत्या यशस्वी होऊ शकतो हेही सुचकतेने स्पष्ट केले.

विनोद येनुरकर यांनी संत निरंकारी मिशनचे वतीने रक्तदान शिबीर आयोजित करुन एक चांगला पायंडा पाडला जात असून यामुळे समाजाची खरी सेवा केली जात असल्याचे मत व्यक्त केले व या उपक्रमाला शुभेच्छा देताना मिशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांची समाज हितासाठी सुरू असलेली वाटचाल अधिक समृद्ध व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना किशन जी नागदिवे म्हणाले की निरंकारी बाबा हरदेव सिऺह जी महाराज यांच्या वचनानुसार रक्त हे मानवाच्या नाडी मध्ये वाहिले पाहिजे.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदानासाठी रक्तदात्यांनी स्वतःहून पुढे यावे. रक्तदान हे मानवतेचे कार्य आहे आजपर्यंत निरंकारी मिशन तर्फे १३ लाखाहून अधिक रक्तदान झाले आहे.सामाजिक बांधिलकी जपून संत निरंकारी मिशनच्या वतीने अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहे ,आमचे हे कार्य जात,धर्म,पंथ यांचा भेदभाव न करता अविरतपणे सुरू आहे आणि आमचे सगळे व्यवहार हे पारदर्शी असल्याने, इथे लहान मोठा असा भेदभाव केला जात नाही. आम्ही आमच्या सेवार्थींना समान दर्जाची वागणूक देतो आणि व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे ,यांचा लाभ समस्त समाजाने घ्यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली , व स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबीर अमृत जल प्रोजेक्ट अभियान नेहमीच राबविण्यात येत आहे. असे प्रतिपादन नागदेवे यांनी केले .सदर शिबिरात जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली रक्तपेढी टीम तसेच जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर रक्तपेढी टीम यांनी आपली जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन हर्षल सोमणकर यांनी केले तर आभार विलास सिडाम सर यांनी मानले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक संतोष निकुरे, महेश रेड्डीवार तसेच सेवादल संचालिका प्रीती उधवानी, विष्णू उधवानी, कवडूजी कोल्हे, तसेच ब्रांच मधील सर्व सेवादल सर्व निरंकारी महात्मा यांनी सहकार्य केले .