मूल : मानवहित शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचाली अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर व विकास राचेलवार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांचे सूचनेनुसार मानवहित शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित अनु. प्राथमिक तथा माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा जानाळा, त. मुल जि. चंद्रपूरयेचे जनजाती गौरव दिन साजरा करण्यात
आला.
या कार्यक्रमा अंतर्गत प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा नृत्य,
चित्रकला, वेशभूषां इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून वर्षा परचाके माजी जि.प. सदस्य व भालेकर यांनी आदिवासी समाजाचे दैवत व क्रांतिकारी नेते ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कसा लढा दिला याबदल माहिती दिली व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच या कार्यक्रमाचे संचालन वर्ग दहावीचा विध्यार्थी लक्ष्मण गावडे व आभार प्रदर्शन जेमसिह बेक या विध्याध्यनि केले. या गौरव दिनी विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमात अल्पोपहारव जेवण देण्यात आले. कार्यक्रमाला अनिल बुटे प्राथ. मुख्या. भूषण काळे माध्य. मुख्या. चनफने, पथाडे, हत्तीमारे, बादफले, तोडसम, गोनेवार, गुडावर, उराडे, बोड्डावार व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक प्रयव करून कार्यक्रम यशस्वी पार पडला.
·
Home आपला जिल्हा Breaking News अनुदानित प्राथमिक तथा माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, जानाळा येथे जनजाती गौरव दिन...






