Home आपला जिल्हा Breaking News रस्त्यावर दिशानिर्देशक व रिफ्लेक्टर लावण्यात यावे, युवक काँग्रेसचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन

रस्त्यावर दिशानिर्देशक व रिफ्लेक्टर लावण्यात यावे, युवक काँग्रेसचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन

68

खेडी ते गोंडपिपरी रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करा
मूल : खेडी ते गोंडपिपरी रस्त्याचे बांधकाम मागील कित्येक वर्षापासून सुरू असून अजूनही त्या रस्त्याचे पूर्ण बांधकाम झालेले नाही. सदर बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असून यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आढळून येत आहे. रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे व बेफीकीरीमुळे ठिकठिकाणी रस्ता उघडलेला असून रस्त्यावर गिट्टी पसरलेली आहे व खड्डे पडलेले आहेत. यामुळे या रस्त्यावर नेहमीच अपघाताचे सत्र सुरू असून या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावे लागत आहे. सदर रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाविरोधात आंदोलने, मोर्चेही करण्यात आले होते.
सदर रस्त्याच्या कंत्राटदाराने थातुरमातून रस्ता बांधून वेळकाढूपणा करीत आहेत. संबंधित रस्त्याच्या शासकीय अधिकाऱ्यांचे यावर कोणतेही नियंत्रण नसून भ्रष्टाचारामध्ये यांचाही समावेश आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाचे करोडो रुपये खर्च करूनही रस्त्यावर अजूनही कोणतेही दिशानिर्देशक व रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाही. या निकृष्ट बांधकाम झालेल्या रस्त्यामुळे कित्येक प्रवाशांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
रस्त्यावरील रिफ्लेक्टर हे छोटे परावर्तित करणारी उपकरणे आहेत जी रस्त्याच्या कडेला किंवा मधोमध लावली जातात. परंतु सदर रस्त्याच्या बांधकामात मागील कित्येक वर्षापासून कोणतेही दिशा निर्देशक व रिफ्लेक्टर लावले गेले नाही. सदर बाब ही अतिशय गंभीर असून शासनाची व जनतेची दिशाभूल करून रस्त्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे असे दिसून येते. सदर रस्त्याच्या बांधकामाची योग्य ती चौकशी करून संबंधित कंत्राटदाराच्या कंपनीला काळ्या यादी टाकावे याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक२ चे कार्यकारी अभियंता चंद्रपूर यांना देण्यात आले. 
मागणी पूर्ण न झाल्यास युवक काँग्रेस तीव्र रास्ता रोको आंदोलन करणार
कार्यकारी अभियंता यांनी एका आठवड्यात सदर काम सुरळीत करून दिशानिर्देशक व रिफ्लेक्टर लावण्यात येईल असे आश्वासन दिले. जर वरील मागणी पूर्ण झाली नाही तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देताना युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन नीलमवार, बेंबाळचे सरपंच चांगदेव केमेकार, युवक काँग्रेसचे आकाश दहिवले उपस्थित होते.