प्रतिनिधी / चंद्रपूर : मुल पोलीस स्टेशन हद्दीतील मोरवाही येथील वयोवृध्द महिलेस मारहाण करुन जबरी चोरी करणारे दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले. प्रनिकेत दिलीप शेन्डे (२२), तनिष्क ओम मंडलेकर (१९) दोन्ही रा. ताडाळा रोड वार्ड क. ११ मुल असे आरोपीचे नाव आहे.
२० मे २०२५ रोजी पोलीस स्टेशन मुल हद्दीतील मौजा मोरवाही येथील रहिवासी श्रीमती धुपताबाई प्रल्हाद रायपुरे (६५) ही आपले राहते घरी झोपेत असतांना रात्रौ १:०० वाजताच्या सुमारास अज्ञात दोन इसम
तिच्या घराचे मागच्या बाजुला रचुन ठेवलेल्या विटा बाजुला करुन घरामध्ये प्रवेश करुन वयोवृध्द महिलेस तोंडावर हाताबुक्कयांनी व काठीने मारहाण करुन जखमी केले व तिचे गळ्यामध्ये असलेले ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र किंमत ४० हजार रुपयाचा माल जबरदस्तीने हिसकावुन चोरुन नेले होते. यावरुन पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्रमांक २००/२०२५ कलम ३०९ (१), ३३३, ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्या आला होता.
सदर गुन्हयांचे गांभीर्य पाहता, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील एक शोध पथक मुल परिसरात पाठवुन कौशल्यपुर्ण व तांत्रिक तपासावरुन गुन्हयातील आरोपी प्रनिकेत दिलीप शेन्डे (२२) व तनिष्क ओम मंडलेकर (१९) दोन्ही रा. ताडाळा रोड वार्ड क. ११ मुल यांना ताब्यात घेवुन बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार नयन रामटेके रा. मुल याचेसह मिळून सदर गुन्हा केला असुन चोरीचा मंगळसुत्र मध्यप्रदेश राज्यातील नयनपुर येथे विकल्याचे सांगत असल्याने दोन्ही आरोपी पुढील तपासकामी पोलीस स्टेशन मुल चे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.
Home आपला जिल्हा Breaking News वयोवृध्द महिलेस मारहाण करुन जबरी चोरी करणारे दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने...