दोन जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला केले जेरबंद
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभिड तालुक्यातील तळोधी (बा) वनपरिक्षेत्र मध्ये दोन जणांचा बळी घेणाऱ्या अंदाजे ८ वर्षीय नर वाघाला आज जेरबंद केले.
आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गंगासागर हेटी बिट सावर्ला रिट सर्वे क्रं. २ मध्ये TATR २२४ वाघाला डॉट ने बेहोश करून जेरबंद केले. या वाघाने ताडोबा बफर क्षेत्रातून तळोधी (बा) वनपरिक्षेत्र मध्ये प्रवेश करून दोन जणांना ठार केले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाघ पकडण्याची परवानगी घेतल्यानंतर ब्रम्हपुरी वनविभाग चे उपवनसंरक्षक राकेश सेपट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, जीवशास्त्रज्ञ, राकेश आहुजा, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉ. रविकांत खोब्रागडे आणि शूटर अजय मराठे पोलीस यांनी वाघिणीला डॉट करून बेहोश करून जेरबंद केले.
VNX तळोधी वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण कन्नमवार यांच्या नेतृत्वाखाली अरविंद माने क्षेत्र सहाय्यक तळोधी, राजेंद्र भरणे वनरक्षक आकापूर, घनश्याम लोनबळे वनरक्षक देवपायली, पंडित मेकेवाड वनरक्षक आलेवाही,
संदीप चुधरी वनरक्षक तळोधी, स्वाब फाउंडेशन चे अध्यक्ष यश कायरकर, फाउंडेशन चे बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, आरआरटी ताडोबा, पीआरटी पथक, वनमजूर यांनी सहकार्य केले.
स्वाब
सदर वाघाने १५ एप्रिल रोजी गंगासागर हेटी निवासी कुंडलिक मारोती बोरकर(४५) तसेच १८ मे रोजी वा निवासी मारोती नकटू शेंडे (६४) यांना जखमी केले होते. उपचादरम्यान त्यांचे निधन झाले होते.
Home आपला जिल्हा Breaking News नागभिड तालुक्यातील तळोधी (बा) वनपरिक्षेत्र मध्ये दोन जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला केले...