अशी आहेत आवश्यक कागदपत्रे :विद्यार्थी,पालकांसाठी माहिती प्रवेशाचे दाखले असे मिळवा

12

दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला.तंत्रनिकेतन,औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय ,वैद्यकीय ,कृषी,अभियांत्रिकी,अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाल्या असून विद्यार्थी तयारी लागले आहेत.त्यासाठी विविध दाखले व प्रमाणपत्राची गरज भासते.ही प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अडचणी येवू नये,याकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती,प्रक्रिया कशाी चालते या
ची माहिती प्रगती कॉम्यूटर सेतू केंन्द्र व प्रेरणा आपले सरकार सेवा केंन्द्र ने विद्यार्थी आणि पालकांना उपलब्ध करून देत आहेत.

उत्पन्नाचा दाखला 1 वर्षाचा,3 वर्षाचा
1 उत्पन्नाचा तलाठयांचा दाखला
2 नोकरी असल्यास आयकर विवरणपत्र
3 आधारकार्ड

या दाखल्यासाठी सेवा केंन्द्रात अर्ज करावा.हा दाखला मिळविण्यासाठी शासनाने 15 दिवसांची मुदत दिली आहे.

डोमिसिअल :— वय अधिवास आणि राष्टीयत्वाचा दाखला
1 मूळ महाराष्टाचे रहिवासी असणे आवश्यक
2 शाळा सोडल्याचे दाखला
3 15 वर्षाचा रहिवास सिध्द करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वीज बिल ,सातबारा,आदि
4 रेशनकार्ड,आधारकार्ड
या दाखल्यासाठी सेवा केंद्राकडे अर्ज करावा. संबंधित दाखला मिळण्याची मूदत 15 दिवस आहे.

जातीचा दाखला
ओबीसी
आवश्यक कागदपत्रे
1 घराण्यातील ज्याचा सन 1967 पूर्वी जन्म झाला आहे. त्या
व्यक्तीचा जातीचा पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून
द्यावे. उदा. शाळेचा दाखला,तहसील कार्यालयातील
जन्म नोंदी रक्तनात्यातील वंशावळ सिध्द करणारे पुरावे.
2 सन 1967 पूर्वीचा रहिवासबाबतचा महसूल पुरावा
उदा. 1967 पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतीकडून
मिळणारे घरठाण पत्रक
3 रेशनकार्ड,आधारकार्ड,

विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त जाती आणि भटक्या जमाती
एसबीसी,व्हीजेएनटी
घराण्यातील ज्याचा सन 1961 पूर्वी जन्म झाला आहे.त्या
व्यक्तीचा जातीचा पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून
द्यावे उदाहरणार्थ शाळेचा दाखला,
तहसील कार्यालयातील जन्म नोंदी रक्तनात्यातील वंशावळ
सिध्द करणारे पुरावे.
2 सन 1961 पूर्वीचा रहिवासबाबतचा महसूल पुरावा.
उदा. 1961 पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतीकडून
मिळणारे घरठाण पत्रक
3 रेशनकार्ड, आधारकार्ड

अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती एस.सी एस.टी
1 घराण्यातील ज्याचा सन 1950 पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीच्या पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावा उदाहरणार्थ :— शाळेचा दाखला,तहसील कार्यालयातील जन्म नोंदी रक्तनात्यातील वंशावळ सिध्द करणारे पुरावे.

2 सन 1950 पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा उदा 1950 पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायत कडून मिळणारे कागदपत्रे
3 रेशनकार्ड,आधारकार्ड

या दाखल्यांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
सन 1967,1961 आणि 1950 ही वर्ष मानीव दिनांक पुरावा ग्राहय धरले आहेत. या दिनांकापूर्वी जो ​रहिवास पुरावा असेल त्या संबंधित तहसील कार्यालयातील महा ई सेवा केंन्द्रात अर्ज