पोलीस उपअधीक्षक प्रमोद चौगुले यांना निरोप

50

पोलीस उपअधीक्षक प्रमोद चौगुले यांना निरोप
मूल : : येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपअधीक्षक प्रमोद चौगुले परी. पोलीस निरीक्षक ( ठाणेदार) म्हणून तीन महिन्यांचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केला ११ मे हा त्यांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस असल्याने पोलीस पाटील संघटना मूल च्या वतीने रविवार दि ११ मे ला पंचायत समिती सभागृहात निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष शशिकांत गणवीर, सत्कारमूर्ती पोलीस उप अधीक्षक प्रमोद चौगुले तर विशेष अतिथी म्हणून उपाध्यक्ष अमोल वाकुडकर, सचिव संतोष शुद्धलवार माजी अध्यक्ष गोपाल ठिकरे, पुंडलिक जवादे, संगीता चलावार, नंदा शेंडे आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी पोलीस पाटील संघटना पदाधिकारी यांच्या वतीने पोलीस उपअधीक्षक प्रमोद चौगुले यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला.

माझ्या नोकरीतील मुल पोलीस ठाणे पहिले असून पोलीस पाटलांच्या सहकार्याने अनेक गुन्हे हाताळता आले. प्रात्यक्षिकरित्या अनेक बाबी शिकता आल्या.तालुक्यातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जुनगाव येथील पोलीस पाटलाच्या अपघाती निधनानंतर संघटनेने दिलेला परिवाराला आर्थिक मदत व धीर हा प्रसंग कायम स्मरणात राहणारा असून पोलीस पाटील म्हणून आपण आपली कर्तव्या सोबतच माणुसकीची जपणूक करीत आहात. हा ठेवा माझ्यासाठी अनमोल शिदोरी असल्याचे भावनिक उद्गार पोलीस उपअधीक्षक प्रमोद चौगुले यांनी सत्काराला उत्तर देताना स्पष्ट केले. कार्यक्रमाचे यशस्वी संचालन बाळू वाटगरे तर आभार विजयकुमार दुर्गे यांनी मानले यावेळी मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेकडो पोलीस पाटील उपस्थित होते. (ता. प्र. )