Home आपला जिल्हा Breaking News जि.प.उच्च प्राथ.शाळा कोसंबी येथे गणराज्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

जि.प.उच्च प्राथ.शाळा कोसंबी येथे गणराज्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

104

मुल -प्रथम शाळेतील ध्वजारोहण माननीय ज्ञानेश्वरी चौधरी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांचे शुभहस्ते करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर प्रभातफेरी काढून हनुमान मंदिर चौकातील ध्वजारोहण माननीय अर्चना ताई मोहुर्ले पोलिस पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर ग्राम पंचायत मधील ध्वजारोहण सरपंच माननीय रविंद्र भाऊ कामडी यांचे शुभहस्ते करण्यात आले* शाळेत सभेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रविंद्र भाऊ कामडी सरपंच कोसंबी, प्रमुख अतिथी माननीय ज्ञानेश्वरी चौधरी अध्यक्ष शाव्यस, सारीकाताई गेडाम उपसरपंच, मनिष चौधरी सदस्य, चंदाताई कामडी सदस्य, रोशनी ताई मोहुर्ले सदस्य, अरुणा ताई वाढई सदस्य, प्रभाकरराव चौधरी तंटामुक्त समिती अध्यक्ष, अर्चना ताई मोहुर्ले पोलिस पाटील, सुभाषराव गुरनुले तंटामुक्त समिती अध्यक्ष, माधवराव सोनुले जेष्ठ प्रतिष्ठीत नागरिक, अंबादास भाऊ गिरडकर ज्येष्ठ कार्यकर्ते, राजेंद्र भाऊ गिरडकर माजी अध्यक्ष शाव्यस, शामरावजी मोहुर्ले प्रतिष्ठीत नागरिक, माननीय विपीन वाकडे ग्रामसेवक, डॉ निता दुधे मॅडम, शा.व्य.स. तथा मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.
त्यानंतर आठ विद्यार्थ्यांचे भाषणे झाली. भाषणानंतर लगेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. नवरत्न, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेला श्रेयश कुमेश लेनगुरे याला प्रमाणपत्र व बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सरपंच माननीय रविंद्र भाऊ कामडी यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. स्पर्धेत नंबर पटकविण्यात सर्व कोसंबी वासीयांनी बहुमूल्य मदत केल्याचे सांगितले. स्वच्छ, सुंदर व निरोगी गाव राहण्यासाठी सर्वांनी जबाबदारी उचलण्याचे आवाहन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत गटलेवार यांनी प्रास्ताविकासह संचलन केले.
विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व भाषणांची उत्तम तयारी रामकृष्ण गिरडकर शिक्षक आणि युवराज ठाकरे विषय शिक्षक यांनी करुन घेतली.
अध्यक्षीय भाषणानंतर खाऊ वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
ग्रामपंचायत, महिला भगिनी व युवकांच्या सहकार्यामूळे गणराज्य दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.