महर्षी वाल्मिकी गेटचा लोकार्पण सोहळा ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला. मूल नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांच्या नेतृत्वाखाली काल 26 जानेवारी 2024 ला झालेल्या भोई समाज गेटचे लोकार्पण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. भोई समाज चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला भाजप कार्यकर्ते तसेच वार्डातील नागरिक उपस्थित होते. प्रशांत समर्थ यांच्या पुढाकाराने तरुण सुदृढ निरोगी राहावे यासाठी वार्डातील तरुणांनी प्रशांत समर्थ यांच्या द्वारे व्यायाम साहित्य मागणी केली. सुधीर मुनगंटीवार यांनी ती मागणी मान्य करून लवकरात लवकर उपलब्ध करून देईल असे आश्वासन दिले.






