प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) अंतर्गत १४ व्या हप्त्याचे वितरण जून महिन्यात होत आहे. कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार 22/06/222 जूनला ‘पीएम किसान’चे काम करण्यासाठी 22/06/2023 पर्यंत शिबिराचे आयोजन केले आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेकरिता माहे एप्रिल ते जुलै २३ या कालावधीतील चौदाव्या हफ्त्याच्या लाभ देण्यास संबंधाने पूर्व कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याकरिता शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया, आधार लिंकिंग व लँड सीडिंग प्रक्रिया महत्त्वाची आहे. ती पूर्ण करण्याच्या अनुषंगाने कृषी विभागातर्फे ग्रामपंचायत राजोली कार्यालय येथे नोंदणी अभियान 22/06/2023 राबविण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये संपूर्ण कृषी विभाग, आत्मा यंत्रणा, पोस्ट खाते, बँका तसेच सामाईक सुविधा (CSC) हे सहभागी होणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.केंद्राने योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींचे बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणीकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. त्याशिवाय त्यांना योजनेचा पुढील हप्ता अदा होणार नाही. बँक खाते आधार संलग्न करणे व ई-केवायसी करणे प्रलंबित आहे.
या शिबिराची पूर्वतयारी कृषी विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू असून प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिराबाबत प्रत्येक गावामध्ये नोटीस लावणे, दवंडी देणे तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
प्रलंबित लाभार्थ्यांनी शिबिरात सहभागी होऊन त्यांची ई-केवायसी करण्यासाठी कृषी विभागाच्या मदतीने पीएम किसान पोर्टलवरील Farmers corner मधील ई-केवायसी- OTP आधारित सुविधेद्वारे अथवा सामायिक सुविधा केंद्र (CSC) च्या मदतीने अथवा पीएम किसानच्या नवीन ॲपद्वारे Face authentication च्या माध्यमातून ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे.
संबंधित लाभार्थ्याला जर बँक खाते आधार संलग्न करायचे असेल तर शिबिरावेळी बँकेच्या सहकार्याने बँक खात्यास आधार संलग्न करावा किंवा शिबिरावेळी पोस्टमास्तर यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खाते उघडावे व १४ व्या हप्त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.






