Home आपला जिल्हा Breaking News पॅनकार्ड आधारशी लिंक करताना 1000 दंड@आयकर विभागाने करावी जनजागृती

पॅनकार्ड आधारशी लिंक करताना 1000 दंड@आयकर विभागाने करावी जनजागृती

149

पॅन कार्ड आधारशी (पॅन-आधार लिंक) लिंक करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. हे काम करण्यासाठी यापूर्वी 31 मार्च 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ती तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड 30 जून 2023 पर्यंत लिंक करता येणार आहेत. आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवण्याच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्णयानंतर, नवीन निश्चित तारीख म्हणजे 30 जून 2023पर्यंत हे काम करण्यात अयशस्वी झाल्यास तुमच्या पॅन कार्डचा काहीही उपयोग होणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. 

आधार आणि पॅनकार्ड लिंक करायला सरकार एक हजार रुपये फी दंड म्हणून आकारत आहे. जे आयकर रिटर्न भरतात त्यांनी व ज्यांना इन्कम टॅक्सबाबतचे ज्ञान आहे त्यांनी किंवा त्यांच्या सीएने पूर्वीच वेळेत लिकिंगचे काम केले आहे. त्यामुळे याचा फटका प्रामुख्याने आयकर विवरण न भरणाऱ्या गरीब वर्गातील व त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मोलमजुरी करणाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे आयकर विभागाने किंवा शासनाने उशिरा आधार-पॅनकार्ड लिंकिंग करत आहेत, त्यांच्याकडून दंड घेऊ नये. त्याबाबत प्रत्यक्ष शासकीय आयुधाचा वापर करून जनजागृती करून पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच शहरी भागातील मोलमजुरी करणारे, सर्वसामान्य नागरिक, निराधार परित्यक्त्या यांनी फक्त बँकेत खाते उघडण्यासाठी, सरकारी अनुदानासाठी किंवा एफडी व्याजदरावर टीडीएस कापला जाऊ नये म्हणून पॅनकार्ड काढले. अशा सर्वसामान्य नागरिकांनी पूर्वी गर्दीत रांगेत उभे राहून आधारकार्ड काढले होते.तेव्हाच्या
आधारकार्डमध्ये  कॉम्प्युटर ऑपरेटरच्या चुकीमुळे अनेकांच्या नावात, जन्मतारखेत चुका झाल्या होत्या. त्यामुळे अनेकांची आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक होऊ शकली नाहीत.ते आता सक्तीचे असल्याने सर्वसामान्य नागरिक ती अपडेट करू लागले आहेत. पण यामध्ये बरेच नागरिक विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना हे लिंक करण्याचे काम अजूनही जमत नाही, हेच दिसून येत आहे.
अनेकांना लिंकिंग करणे जमेना !
स्मार्टफोन वापरणारे सर्वच लोक काही सुशिक्षित, शिकलेले असतील, हा गैरसमज आयकर विभागाने काढून टाकला पाहिजे व शासनाची आयुधे जसे आशा सेविका, सीएससी सेंटर, ग्रामपंचायत वरपालिका गती माध्यमात कोरोनाकरूनव्हॅक्सिनच्यावेळी ज्या पद्धतीने काम करून नागरिकांना व्हॅक्सिन देण्यात आल्या, त्याच पद्धतीने आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी शिबिरे लावावीत तरच सर्वसामान्य नागरिकांचे आधारकार्ड पॅनकार्डची लिंक होईल. दंड आकारणी हा काही त्यावरचा रामबाण उपाय नाही. म्हणूनच ही दंड आकारणी रद्द करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

30 जूननंतर पॅन निष्क्रिय केले जाईल

तुम्ही पॅन-आधार लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. असे झाल्यास कार्डधारक म्युच्युअल फंड, शेअर बाजारातील गुंतवणूक यासारख्या गोष्टी करू शकणार नाहीत. इतकंच नाही तर आजच्या काळात बँक खाते उघडण्यापासून ते रिअल इस्टेट किंवा इतर कोणत्याही व्यवहारापर्यंत पॅनकार्ड हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे मुदत वाढवून देण्यात आली असली तरी शेवटच्या तारखेची वाट न पाहता हे काम लवकरात लवकर पूर्ण करणेच योग्य आहे.

बंद कार्डचा वापर केल्यास…

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यावर, तुम्ही कोणत्याही आर्थिक कामासाठी कागदपत्र म्हणून वापरल्यास, तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आयकर कायद्याच्या कलम 272B अन्वये एवढ्या मोठ्या दंडाची तरतूद आहे. 30 जून 2023 पर्यंत तुम्ही 1000 रुपये दंड भरून तुमचा पॅन आधारशी लिंक करू शकता. खरं तर, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 30 जून 2022 पासून आधारला पॅनशी लिंक करण्यासाठी 1000 रुपयांचा विलंब दंड निश्चित केला आहे. उशीरा दंड भरल्याशिवाय, तुम्ही पॅनला आधारशी लिंक करू शकणार नाही.

 

पॅन-आधार लिंक करणे खूप सोपे आहे

प्राप्तिकराच्या अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in वर लॉग इन करा.

क्विक लिंक्स विभागात जा आणि आधार लिंक वर क्लिक करा.

तुमच्या स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल.

तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक येथे टाका.

‘I validate my Aadhaar details’ हा पर्याय निवडा.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल.

ते भरा आणि नंतर ‘Validate’ वर क्लिक करा.

दंड भरल्यानंतर तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.