Home आपला जिल्हा Breaking News स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रा आज मूल शहरात

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रा आज मूल शहरात

138

मूल : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ काढण्यात आलेली सावरकर गौरव यात्रेचे ७ एप्रिलला मूल शहरातआगमन होत आहे. गौरव यात्रेनिमित्त आयोजित केलेल्याकार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, रत्नमाला भोयर, नंदकिशोर रणदिवे आदींची उपस्थिती राहणार
आहे.स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगते यज्ञकुंड म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आज ७ एप्रिल रोजी मूल शहरात आगमन होत आहे.
चंद्रपूर मार्गावरील मूलच्या इको पार्क येथुन सकाळी ११ वाजता सदर यात्रेला प्रारंभ होणार असुन मूल येथील गांधी चौक येथे कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

यात्रेनिमीत्य आयोजीत केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणुन वने व सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणुन वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे , भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बल्लारपूर नगर पालीकेचे माजी अध्यक्ष हरीश शर्मा , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले , मूल नगर पालीकेच्या माजी अध्यक्षा रत्नमाला भोयर उपस्थित राहणार आहेत.

सदर यात्रेत आणि आयोजीत कार्यकमाला नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा समिती, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या वतिने करण्यात आले आहे.