बाप रे भरदिवसाच आत्महत्याचा प्रयत्न @चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर

97

 मुल:- तालुक्यातील  बेंबाळ पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीतील नांदगाव बसस्थानकाजवळ एका युवकाने विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. धीरज रामचंद्र देवनपल्लीवार (२९, रा. गोवर्धन(मूल) असे युवकाचे नाव असून, त्याचीप्रकृती गंभीर असल्याने पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे हलविण्यात आलेले आहे. धीरज हा विवाहित असून त्याला पत्नी, दोन मुले व आई-वडील असा परिवार आहे. तो एका नातेवाइकाच्याअंत्यसंस्कारासाठी गेला होता. परत येताना नांदगाव बस स्टँडवर अचानक त्याने विष प्राशन केले. याची माहिती तिथे उपस्थितांना मिळताच त्यांनी लगेच धीरजला उपचारासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात हलविले. तिथून चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात त्याला रेफर करण्यात आले. आत्महत्येचा त्याने प्रयत्न का केला, हे अद्याप कळू शकले नाही. मात्र लवकरच बेंबाळ पोलिस त्याचे बयाण  नोंदविणार असल्याची माहिती मिळाली आहे.