चंद्रपूर :- विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शाखेचे सचिव इरफान शेख यांची सर्व मान्यवरांच्या सहमतीने विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखेच्या शाखाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.इरफान शेख यांचे साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व साहित्य क्षेत्रात दूरवर मिळविलेल्या प्रसिद्धीने ते अनेकांच्या परिचयात आहेत. एक तरुण कार्यकर्ता शाखेचा शाखाध्यक्ष झाल्याने साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. इरफान शेख यांची शाखाध्यक्ष म्हणून निवड व्हावी यासाठी गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, यांनी उपस्थित सगळ्यांना सुचविल्यावर डॉ. पद्मरेखा धनकर आणि श्रीपाद जोशी यांनी अनुमोदन दिले व उपस्थित सर्व सदस्यांनी त्यास सहमती दिली.
इरफान शेख यांनी नवी कार्यकारिणी गठित केकेली असून संवर्धक डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, सल्लागार म्हणून डॉ. अशोक वासलवार, माजी शाखाध्यक्ष डॉ. शरच्चंद्र सालफळे, प्रा. डॉ. प्रमोद काटकर यांची तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. पद्मरेखा धनकर, आणि प्रा. श्याम धोपटे, सचिव डॉ. परमानंद बावनकुळे, सहसचिव श्याम हेडाऊ, कोषाध्यक्ष सुनील बावणे, प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील मेश्राम तर कार्यकारिणी सदस्य म्हणून श्रीपाद जोशी, प्रा. नरेंद्र टिकले, प्रदीप देशमुख, योगेश भलमे, गोपाल शिरपूरकर, आणि नरेशकुमार बोरीकर यांची निवड करण्यात आली.
बैठकीला माजी अध्यक्ष डॉ. शरच्चंद्र सालफळे, डॉ. अशोक वासलवर, वि. सा. संघाचे केंद्रीय प्रतिनिधी डॉ. श्याम मोहरकर यांचेसह अन्य सभासद उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीचे वि. सा. संघ नागपूरचे केंद्रीय अध्यक्ष श्री. प्रदीप दाते, यांचेसह चंद्रपुरातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.