Home आपला जिल्हा Breaking News मूल @ जीवघेणा हल्ला; एक आरोपी अटकेत

मूल @ जीवघेणा हल्ला; एक आरोपी अटकेत

199

लोखंडी रॉडने हल्ला; एक जण गंभीर
मूल येथील प्रभाग क्रमांक ८ मधील शासकीय गोदाम परिसरात किरकोळ कारणावरून एकाने बुधवारी दि. १० लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. यात इसम गंभीर जखमी झाला. मारोती मेश्राम (४५) असे जखमीचे नाव आहे.
आरोपी अक्षय गोवर्धन (४४) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात तपास सुरू असतानाच आरोपी अक्षय गोवर्धन स्वतःहून शरण आला.
दरम्यान, गंभीर जखमी मारोती मेश्राम यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. जखमीवर उपचार सुरू आहे. मूल पोलिस वादाचे नेमके कारण
शोधत आहेत.