शहराच्या हद्दवाढीनंतर झपाट्याने अनेक भागात नव्या वसाहती वाढत आहेत. तिथे रस्ते नाल्या झालेले आहेत मात्र, मूल शहरातील अनेक वर्षांपासूनच्या विश्रामगृहासमोरील जुन्या वस्तीमधील प्रगती कॉम्म्यूर ते गोवर्धनच्या रस्त्यांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील चौफेर भागात झपाट्याने नवनवीन घरे व बंगल्यांचे बांधकाम होत आहेत. मात्र, गेल्या 25 वर्षांपासून रहिवासी असलेल्यांना अद्याप रस्ता, नाल्या सुविधा उपलब्ध न झाल्याने नगरपालिका प्रशासनाबद्दल नापसंती व्यक्त होत आहे. रस्ताचा सिमेंन्टचा नसल्याने दळणवळणासह वार्डातील ये जा करणारे नागरिक, शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट होते. विशेष म्हणजे या परिसरात मुरूम,काळी माती असल्याने पावसाळ्यात चार ते पाच महिने चिखलात वाट तुडवत रस्ता काढावा लागतो. कोणत्याही व्यक्तीचे अतिक्रमण नसंताना आलेले 2 वेळेचे निधी वापस जावून दुसरीकडे लावून कुणीही या रस्ताकडे लक्ष दयायला तयार नाही फक्त आश्वासन दिले जात आहे..आता अशी नवीन माहिती मिळाली कि, या रस्तावर कुणी तरी कोर्टात दावा केला असे सांगतात. तर पिडब्लू अधिका—यांना विचारला असता त्यांनी म्हणतात का,मूलच्या मूख्याधिका—यांकडून नाहारकत प्रमाणपत्र घेवून या मग चालू करू असे अधीकारी सांगत असतात तर मग रस्ता निघाणार कसं असे प्रश्न जुन्या वस्तीमधील नागरीकांना सहन करावा लागत आहे. रस्ता सिमेंन्ट नसल्याने व पाणी निचऱ्याची व्यवस्था नसल्याने नाली पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे जुन्या वस्तीमधील असललेले 50 घरांची वस्तीचे जनजीवन विस्कळीत होते. नागरिकरणाचा वाढता वेग लक्षात घेऊन विकास आराखड्यासाठी रस्ते आखण्यात आले. मात्र, ते कागदावरच राहिले. रखडलेले रस्ता रुंदीकरण, पर्यायी रस्त्यांचा अभाव यामुळे नागरिकांना गैरसोईला सामोरे जावे लागत असून, रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात नगरसेवकांना सपशेल अपयश आल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.
या सुविधांची वानवाः *अंतर्गत रस्त्यांच्या समस्या कायम *काही भागात रस्ते मंजूर, मात्र कामे रखडली * नवीन कॉलनीत रस्ते, तर जुन्या कॉलनीतील रस्ते प्रतीक्षेत *पावसाळ्यात गुडघ्या इतके पाणी साचते, नागरी जीवन विस्कळीत होते पालिकेच्या माध्यमातून घरपट्टी व कर वसुलीसाठी जशी मोहीम राबविण्यात येते, तशीच मोहिम सुविधांच्या बाबतीत गरजेची आहे. प्रत्येक वार्डात प्रभागात रस्ता व लाईट, पाणी पुरवठा महत्वपूर्ण आहे. याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावे.”- सामाजिक कार्यकर्ते
“अनेक वर्षांपासून पक्के रस्ते नसल्याने पावसाळ्यात घराबाहेर निघणे अवघड होते. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. जुन्या वस्तीच्या भागात रस्त्याची दुरावस्था आहे. रस्त्याच्या बाजूला इलेक्ट्रिक पोल लावण्यात यावे -वैशाली प्रमोद मशाखेत्री , गृहिणी, जुनी वस्ती मूल