दशकापासून नागरिकांचा खडेमय प्रवास :
मूल :— शहरामध्ये विकासाची गंगा वाहत आहे. शहरातील काही अंतर्गत रस्ते सिमेंटीकरण केले जातात. पण जुन्या वस्ती मधील 25 वर्षापासून वस्ती विकासापासून कोसोदुर आहे. हे चित्र दिसते विश्रामगृह रस्तावरील बाजूच्याजुन्यावस्तीमधील पठाण ते गोवर्धनच्या रस्तावरील गेल्या दशकापासून या मार्गावरून खडेमय वाटचाल सुरू आहे. पण अद्यापही रस्ताची
दुरूस्ती करण्याची जाग शासनाला,प्रशासनाला आली नाही. नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मूल शहरातील अंतर्गत रस्ता गोवर्धन ते पठान रस्ता आहे.या रस्तांनी जेष्ठ नागरीक,विद्यार्थी,
वस्ती मधील नागरीक जाणे येण्याकरीता रस्ता खडेमय असल्याने गेल्या 25 वर्षापासून या रस्ताचीदुरूस्तीची मागणी असून सुध्दा अद्यापही दुर्लक्ष केल्या जात आहे. रस्तावर खडा पडल्यानेअवागमन करणे कठीण झाले आहे. या रस्तावर वस्तीमधील नागरीक,विद्याथी,दररोज प्रवास करतात पावसाळयाच्या वेळी खुप त्रास सहन करावा लागत असतो.
आलेल्या नवनियुक्त नगराध्यक्षा ,उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक यांनी लक्ष दयावे त्यांनी तरी यारस्ताचा मार्ग कायमस्वरूपी मार्गी लावावा,अशी अपेक्षा आहे.पण या रस्ताच्या बांधकामाबाबत लोकप्रतिनिधीचे सुध्दा मौन असल्याने नागरिकांचा सहनशीलतेचा बांध फुटण्याची वेळ आली आहे.नागरीकांना या रस्ताअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
Post Views: 60