Home आपला जिल्हा Breaking News नांदगावमध्ये थरारक अपघात; पिकअपने पादचाऱ्याला उडवले, 2 जण ठार 13 जख्मी,

नांदगावमध्ये थरारक अपघात; पिकअपने पादचाऱ्याला उडवले, 2 जण ठार 13 जख्मी,

96

चंद्रपूर सीसीटीव्हीत घटना कैद

तेलंगणा येथून रोवणं करून परत येत असताना पिकअप वाहनाने एका पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर वाहन पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. ही घटना आज दि. 21 जानेवारी 2026 ला सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास नांदगाव येथे लक्की बारच्या बाजूला घडली.
अपघातात शेतातून शौचासाठी जाऊन परत येत असलेले हरिदास मेटपल्लीवार (वय 35) यांना पिकअप क्र. MH 34 BZ 3127 ने जोरदार धडक दिली. धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्याच्या कडेला पलटी झाली.
या अपघातात पिकअपमध्ये प्रवास करत असलेल्या डोंगरहळदी येथील रहिवासी सौ. वनिता भिकारू मरस्कोल्हे (वय 40) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच 13 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी महिलेला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून उर्वरित जखमींवर मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे तपास करण्यात येत आहे.