दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे
मुंबई : दहावी अर्थात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेला फेब्रुवारीमध्ये सुरुवात होणार असून, विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे २० जानेवारीपासून ऑनलाइन मिळणार आहेत. प्रवेशपत्रांसाठी
विद्यार्थ्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, अशी सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केली आहे.
विद्यार्थ्यांना
दहावीच्या मंगळवारपासून राज्य परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी ही प्रवेशपत्रे प्रिंट करून त्यावर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आणि शाळेचा शिक्का असणे आवश्यक आहे. यासाठी शाळेने कसलेही शुल्क घेऊ नये, असे आदेश शिक्षण मंडळाने दिले आहेत. परीक्षा प्रवेश शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेशपत्रे उपलब्ध होतील.






