Home आपला जिल्हा Breaking News मॅट्रिकोत्तर शिक्षण@ ३१ जानेवारीपूर्वी नोंदणी करावी

मॅट्रिकोत्तर शिक्षण@ ३१ जानेवारीपूर्वी नोंदणी करावी

44

इतर मागास बहुजन कल्याण  विभागाद्वारे केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत  राज्यातील  विजाभज, इमाव   व विमाप्र
प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता  भारत सरकार मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात
येते.  या योजनेंतर्गत मॅट्रिकपूर्व इयत्ता 9 वी व १० वी तसेच मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज
केंद्र  शासनाच्या https:// scholarships.gov.in (NSP Portal) या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. यावर्षी नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२६ आहे. तरी संबंधित महाविद्यालयांच्यामार्फत  शाळा, Institute Level verification साठी शेवटची तारीख ही १५ फेब्रुवारी असल्याचे विभागाने कळवले आहे. याची जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थी व संबंधित प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी नोंद घ्यावी व नोंदणी वेळेत करून घ्यावी, या संबंधाने काही अडचणी असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिन मडावी, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, भंडारा यांनी केले आहे.