मूल, ता. १५ तालुक्यातील भवराळा येथे चारचाकी वाहनाच्या धडकेत एका पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेआठ वाजताच्यादर- म्यान घडली. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला. गावकऱ्यांनी खेडी ते गोंडपिपरी मार्गावर रस्तारोको आंदोलन केले. याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मृत चिमुकलीचे नाव रूद्रप्रिया सोमेश्वर सरपाते असे आहे.
भवराळा येथील ही रुद्रप्रिया सकाळी आठ वाजताच्या दरम्यान मुख्य
रस्ता ओलांडून किराणा दुकानात गेली होती. दुकानातील सामान घेतल्यानंतर रस्त्यालगत उभी असताना जुनासुर्ला मार्गाकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपच्या चालकाने तिला धडक दिली. त्यात ती चिरडल्या गेली. तिच्या डोक्याचा अक्ष- रक्षः चेंदामेंदा झाला. जागीच गतप्राण झाल्यानंतर भवराळा येथे तणाव निर्माण झाला.
चिमुकलीचा मृतदेह रस्त्यावरच ठेवून गावकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. खेडी ते गोंडपिंपरी मार्ग रोखून धरला. रस्तारोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. तणाव निर्माण झाल्याने येथे जवळपास दोन तासापर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. शेवटी सरपाते कुटुंबीयांची समजूत घातल्यानंतर मृतदेह उचलण्यात आले. मूल येथील उपजि- ल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वाहन जुनासुर्ला येथील असल्या- चे समजते.
खेडी मार्गावर मेंढ्या उतरवून तो गावाकडे जात होता, अशी माहिती आहे. याप्रकरणी वाहनचालक मुकरू मेश्राम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे. चिमुकलीवर भवराळा येथे अंत्यसंस्कार पार पडले. भवराळा येथे चोख पोलिस बंदोबस्त होता..






