काँग्रेसच्या प्रचारार्थ गौतमी पाटिल, तर भाजपाच्या प्रचारार्थ रिंकू राजपूत मूल मध्ये
आज माहौल कुणाचा ?
मूल:- येथील नगर पालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. त्यामुळे रात्री दहा वाजेपर्यंत प्रचारार्थ भोंगे वाजणार आहे. तत्पूर्वी, मूल मध्ये आज दुपारी माहौल राहणार आहे. हा माहौल कुणाच्या पारड्यात जास्त वजन देणार, हे सांयकाळ पर्यंत चित्र स्पष्ट होईल. त्याचे कारणही तसेच आहे. कारण मूल मध्ये आज सोमवारी
लावणी नृत्यांगणा गौतमी पाटिल ही काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ असून दुपारी दोन वाजताच्या दरम्यान भव्य रोड शो रॅलीचे आयोजन आहे. सायंकाळी पाच वाजता रामलीला सभागृहाच्या मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सैराट फेम रिंकू राजपूत अर्थात आर्ची उपस्थित राहणार आहे. सायंकाळी गुजरी चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे आ.विजय वडेटटीवार यांची तोफ तर, दुसरीकडे आ.सुधीर मुनगंटीवार यांची तोफ गरजण्याची शक्यता आहे. कुणाच्या पारडयात कुणाचे वजन जास्त पडणार हे दोन तारखेच्या निवडणुकीअंती कळणार आहे. मतदार गौतमी पाटिलच्या रोड शो वर फिदा होता की,सैराटच्या आर्चीला लाईक करतात? हे माहौलवर अवलंबून राहणार आहे. तुर्तास, नगर पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मूल मध्ये काँग्रेस आणि भाजपचा माहौल गाजण्याची शक्यता आहे. निवडणुकीची हवा कोण फिरवणार गौतमी पाटिल की रिंकू राजपूत याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा आहे.
Home आपला जिल्हा Breaking News मूल मध्ये आज माहौल कुणाचा ?भाजपाच्या प्रचारार्थ आर्चीअर्थात रिंकू राजपूत तर काँग्रेसच्या...






