Home आपला जिल्हा Breaking News 1 तारखेला रात्री 10 वाजता प्रचार थांबेल: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक प्रचारात मोठे...

1 तारखेला रात्री 10 वाजता प्रचार थांबेल: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक प्रचारात मोठे बदल, जाणून घ्या सर्वकाही

96

 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर प्रचारबंदीच्या कालावधीबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. या सुधारणेनुसार, मतदान सुरू होण्यापूर्वी प्रचाराची समाप्ती कधी होईल याबद्दलची पूर्वीची तरतूद बदलण्यात आली आहे.
आयोगाच्या ४ नोव्हेंबरच्या एकत्रित आदेशातील आचारसंहितेबाबत तरतूद सुधारित करण्यात आली आहे. त्यानुसार आता मतदान सुरू होण्याच्या दिवशीच्या अगोदरच्या दिवशी रात्री १० वाजता प्रचार बंद होईल. २ तारखेस मतदान होणार असून १ तारखेला रात्री १० प्रचार थांबेल.
या वेळेनंतर काय बंद राहणार ?
रात्री १० वाजल्यापासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर, निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी / प्रसारण या गोष्टींवर पूर्णपणे निर्बंध असतील. यापूर्वी ४ नोव्हेंबर २०२५ च्या एकत्रित आदेशात मतदान सुरू होण्यापूर्वी २४ तास अगोदर प्रचार बंद होईल, अशी तरतूद होती.
मात्र, अधिनियमातील तरतुदीशी सुसंगतता राखण्यासाठी आता हा बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,

नगर परिषद, मुल चे निवडणुक लढविणारे अध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांना सुचित करण्यात येते की,राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुक – 2025 साठी आदर्श आचारसंहिता दिनांक 04.11.2025 रोजी जारी करण्यात आली असुन एकत्रीत सुधारित आदेश मा. राज्य निवडणुक आयोगाने निर्गमित केले आहे. यामध्ये देण्यात आलेले निर्देश, प्रचलित नियमानुसार निवडणुक प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडावी असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.
मा. राज्य निवडुणक आयोग, महाराष्ट्र यांचे सुधारित आदेश क्र.रा.नि. 2025/प्र.क्र. 17/का. 6 दिनांक 27.11.2025 अन्वये नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये जाहिर प्रचारबंदीच्या कालावधीबाबत सुधारित आदेश जारी केले आहे. सदर आदेशानुसार मतदान सुरु होण्याच्या दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच 02 तारखेस मतदान सुरु होत असल्यास 01 तारखेस रात्रौ 10.00 वाजता प्रचार बंद होईल त्यावेळेपासुन सभा / मोर्चे / ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही तसेच निवडणुक प्रचारासंबंधीच्या जाहिराती प्रसिध्दी / प्रसारण देखील बंद होईल.
तरी नगर परिषद्, मुल चे निवडणुक लढविणारे अध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांना सुचित करण्यात येते की, एक खिडकी पथकातुन देण्यात आलेल्या सर्व परवानगीला वरील आदेश लागु राहिल. तरी दिनांक 01.12.2025 रोजी रात्री 10.00 वाजता नंतर प्रचार बंद होईल त्यावेळेपासुन सभा/मोर्चे /ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही तसेच निवडणुक प्रचारासंबंधीच्या जाहिराती प्रसिध्दी / प्रसारण देखील बंद होईल. त्यामुळे सर्वांनी बॅनर / पोस्टर, होर्डींग, कटआऊट ई. सर्व प्रचाराचे साहित्य दिनांक 01.12.2025 रात्री 10.00 ते 11.00 पर्यंत स्वतःहुन काढून टाकावे. या वेळेनंतर कोणतेही प्रचारासंबंधी साहित्य दिसन आल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग