Home आपला जिल्हा Breaking News मूल शहरातील युवक-युवती म्हणतात@ ‘विकास हवा,आश्वासन नाही,भांडण नको!’

मूल शहरातील युवक-युवती म्हणतात@ ‘विकास हवा,आश्वासन नाही,भांडण नको!’

75

मूल शहरातील २ डिसेंबरला नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. प्रचाराची रणधुमाळी जोमात सुरू असून आपणच विकासाचे महामेरू समजून एकामेकांवर आगपाखड करून मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. या निवडणुकीबाबत मूल शहरातील युवका-युवतींनी वेगवेगळे मत व्यक्त केले असले, तरी अनेकांचा सूर ‘विकास हवा, आश्रासन भांडण नको!’, असा होता.
काही युवकांना लोकशाही प्रक्रियेत आपले मत देण्याचा उत्साह असून ते परिवर्तनाची अपेक्षा करतात, तर काही युवक राजकीय घर्षण आणि पक्षपात यावर नाराजी व्यक्त करत आहेत. काहींचा असा अनुभवही आहे की, राजकीय नेत्यांनी विकासावर आणि जनतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तर काहींनी राजकारण बाजूला ठेऊन विकासावर भर देण्याचे सांगितले.
रस्ते, अतिक्रमणे, स्वच्छता, पिण्याचे पाणी यांसारखे मूलभूत प्रश्न कायम आहे. मतदान करताना विकासाचे व्हिजन असलेला, समस्या सोडविण्यासाठी सक्षम प्रतिनिधी पालिका सभागृहात पाठवायला हवा.मतदान हा लोकशाहीने आपल्याला दिलेला अधिकार असून, तो बजावणे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वच मतदारांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानप्रक्रियेत सहभाग नोंदवून योग्य उमेदवाराला आपले मत द्यावे. अनेकजण या दिवशी मिळालेली सुटी कुटुंबासमवेत फिरण्यासाठी वापरतात; परंतु मतदान बजावायला हवे.रस्ते, नाली, पाणी,स्वच्छता या मूलभूत
सुविधांकडे तर पालिकेतील कारभाऱ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायलाच हवे. सोबतच इतर काही वेगळ्या सोयीसुविधा नागरिकांना देता येतात का, याचाही विचार करायला हवा.
मूल शहरात मोठी ​न.प.मूल ची बिंल्डीग बांधून ठेवलेली आहे परंतू आजूनपर्यंत बेरोजगार युवकांनायुवतीना व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली नाही.
सर्वत्र अतिक्रमण झाले असून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. मागील काळात नगरपालिका निवडणुका झाल्या नसल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगराध्यक्ष, नगरसेवक उपलब्ध नव्हते; परंतु आता नगरपालिका निवडणुका होत असल्याने सत्तेवर येणारा नगराध्यक्ष, नगरसेवकांना लोकांच्या समस्यांची जाण असली पाहिजे.
शहरात उद्योग,मेडिकल कॉलेज नसल्याने बेरोजगारी वाढली असून, शिकलेले युवक नैराश्यात
जगत आहेत. ते राजकारण न पाहता खऱ्या कार्यकर्त्याला मत देण्याचा आग्रह करत असून, शैक्षणिक व रोजगार समस्या सुटण्याची अपेक्षा आहे.