Home आपला जिल्हा Breaking News मासेमारी करताना युवकाचा बुडून मृत्यू@विहिरीत पडून बैलाचा मृत्यू

मासेमारी करताना युवकाचा बुडून मृत्यू@विहिरीत पडून बैलाचा मृत्यू

151

मासेमारी करताना युवकाचा बुडून मृत्यू
मूल :मासेमारी करतानातलावातबुलनयुवकाचा मृत्यू झाला. ही दुदैवी गुरुवारीघटनादुपारी १ वाजता
चितेगाव तलावात घडली. मुन्ना नागो भोयर (३२) रा. टेकाडी) असे मृतकयुवकाचे नाव आहे.टेकाडी येथील
मासेमारसोसायटीच्या वतीने चितेगाव तलावात मत्स्यबीज टाकण्यात आले. मुन्ना भोयर हा नेहमीप्रमाणे दुपारी तलावात मासेमारी करीत होता. दरम्यान तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने खोल डोहात बुडाला. बराच वेळ होऊनही घरी परत न आल्याने कुटुंबीय व गावकरी तलावाजवळ आले. पाहणी केली असता पाण्यात मृतदेह तरंगताना आढळून आला. ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. पोलिस व ग्रामस्थांच्या सहकार्याने तलावात जाळी टाकून मृतदेह बाहेर काढण्यात आला.पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे स्वाधीन करण्यात आले.

विहिरीत पडून बैलाचा मृत्यू
भेजगाव : काठ नसलेल्या विहिरीत पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २२) दुपारी २ वाजता मूल तालुक्यातील चिंचाळा येथील प्रदीप निकुरे यांच्या शेतात घडली. शेतकरी प्रदीप निकुरे यांचा बैल विहिरीजवळ चराई करीत होता. काठ नसल्याने हा बैल विहिरीत पडला. ग्रामस्थांच्या मदतीने बैलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बैलाचा मृत्यू झाला होता. माहिती मिळताच पशुवैद्यक अधिकारी डॉ. संजय बावणे यांनी घटनास्थळी दाखल होत बैलाचे शवविच्छेदन केले. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय गेडाम, पोलिस पाटील विजयकुमार दुर्गे व नागरिक उपस्थित होते. धोका टाळण्यासाठी अशा विहिरींना तातडीने सुरक्षा कठडे बांधवावे, अशी सूचना ग्रामस्थांनी केली आहे.