Home आपला जिल्हा Breaking News ‘ सत्यमेव जयते ‘ ध्वजारोहण कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील प्रथमच केळझर येथे मोठ्या...

‘ सत्यमेव जयते ‘ ध्वजारोहण कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील प्रथमच केळझर येथे मोठ्या उत्साहात

122

सत्यशोधक समाज स्थापन दिवस व १५२ व्या ‘ सत्यमेव जयते ‘ ध्वजारोहण कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील प्रथमच केळझर येथे मोठ्या उत्साहात साजरा. क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.व ‘ सत्यमेव जयते ‘ ध्वजाची मिरवणूक १७ मार्च १८८५ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी पुणे शहरात काढली. व त्यामध्ये बॅड पथक, वसतीगृहातील मूले,समाजाचे अनुयायी कार्यकर्ते मित्र, शिस्तीने सहभागी झाले होते.झेंडयाची मिरवणूकीचे वॄत ‘ दीनबंधू’ पत्रातून अगोदर प्रकाशित झाले.त्या मिरवणूकत ‘ शिवाजी महाराज की जय ‘ आणि ‘ सत्यशोधक समाज की’ जय, या उत्स्फूर्त घोषणा देण्यात आल्या होत्या.त्या झेंडा मिरवणूकीचे मुख्य आयोजक कॄष्णराव भालेकर होते. महात्मा फुले यांची प्रसंगोचीत भाषणे झाली. व ध्वजाचे ब्रीदवाक्य ‘ सत्यमेव जयते ‘ असे कोरलेले होते. ते ध्वज पिवळा, लाल,व हिरव्या रंगाचे होते. त्याच धर्तीवर क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले माळी समाज केळझर चे अध्यक्ष साईनाथ दशरथ लोनबले व पुरुष महिला कमिटी व सत्यशोधक युवा मंचाचे सर्व कमिटी यांनी मिळून ध्वजारोहण कार्यक्रम करण्याचे ठरविले. त्या प्रसंगी मा. महिमा मोहुलॆ व त्यांचे सत्यशोधक सैनिक दलाचे विद्यार्थी, मानवंदना देत परेड संचालन केले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन केले. त्यांनंतर वंदना घेण्यात आली.माळी समाजाचे अध्यक्ष मा. साईनाथ लोनबले व मा. कुंदा निकोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.झेंडा गीत तसेच राज्य गीत म्हटले, मा. साईनाथ लोनबले यांनी मोलाचे मार्गदर्शन करून १५२ व्या सत्यशोधक समाज स्थापन दिवसांच्या शुभेच्छा दिल्या . लहान मुलांना चाॅकलेट वाटप करून ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. संध्याकाळी रॅली काढण्यात आली.त्या मध्ये सत्यशोधक सैनिक दलाचे विद्यार्थी बॅन्ड घेऊन उत्तम प्रकारे कला सादर केले. तसेच सर्व महामानवाच्या वेशभूषा करून सर्व विद्यार्थी सहभागी झाले. त्याचप्रमाणे सत्यशोधक सैनिक दलाचे विद्यार्थीनींनी लेझीम वर आपली कला दाखवली. सर्वांनी दोन रांगेत उभे राहून सत्यशोधक ध्वज प्रत्येकांनी धरून मोठ्या उत्साहात महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर माळी समाजाचे अध्यक्ष व महिला अध्यक्षा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालाअर्पण करण्यात आले. नैसर्गिक आपत्ती म्हणजे पाऊस आल्यामुळे रॅली लवकरच माळी भवन येथे समाप्त करण्यात आली. त्यानंतर माळी समाज भवन मध्ये विद्यार्थ्यांनी स्वागत गीत करून मान्यवरांचे स्वागत केले. मा. सुनील कावळे रा. चिमढा, सत्यशोधक विवाह विधीकर्ता यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ. अभिलाषा गावतुरे व डॉ. राकेश गावतुरे या दाम्पत्यानी सावित्री फुले यांचा वारसा चालवल्यामुळे समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. व त्यांचे मार्गदर्शनही लाभले. याप्रसंगी सर्व माळी समाज पुरुष कमिटी, सर्व माळी समाज महिला कमिटी व सत्यशोधक युवा मंचाचे सर्व कार्यकर्ते,जय शिवराय युवा मंडळाचे कार्यकर्ते, तसेच बहुसंख्य सेंट्रल ओबीसी विचारमंच केळझर चे सभासद तसेच समस्त केळझर वासींयांनी उपस्थित राहुन १५२ व्या सत्यशोधक समाज स्थापना दिवस साजरा केला.