Home आपला जिल्हा Breaking News मारोडा@स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान अंतर्गत भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर

मारोडा@स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान अंतर्गत भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर

87

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत मरोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) भव्य रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये मरोडा पी.एच.सी. अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील गर्भवती महिला तसेच इतर रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मूलचे माननीय गटविकास अधिकारी (BDO) साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासह मरोडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व डॉक्टर आणि आशा सेविका उपस्थित होत्या.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोशल मीडिया तालुका प्रमुख, श्री. शिवम राजू चल्लावार यांनी या शिबिरात विशेष सहभाग घेतला. उपस्थित रुग्णांना त्यांनी फळे आणि बिस्किटे वाटप केली. तसेच, उपस्थितांना आरोग्य आणि जीवनशैली या विषयांवर मार्गदर्शन करून दोन-चार मोलाचे शब्द सांगितले.

या यशस्वी आयोजनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी आणि रक्तदानासाठी प्रोत्साहन मिळाले.