Home आपला जिल्हा Breaking News आरोग्य सेवा प्रणालींचा अविभाज्य भाग फार्मासिस्ट जागतिक फार्मासिस्ट दिन विशेष

आरोग्य सेवा प्रणालींचा अविभाज्य भाग फार्मासिस्ट जागतिक फार्मासिस्ट दिन विशेष

64

रुग्णसेवेतील महत्त्वाचा घटक : आरोग्याचा विचार करा
एखादी व्यक्ती आजारी पडली की लगेच डॉक्टरांकडे जाते आणि औषध घेते. बरे झाल्यानंतर, तो डॉक्टरांचेआभार मानतो, कारण त्यांनीत्याला बरे होण्यास मदत करणारी औषधे घेण्याचा सल्ला दिला. पण या सगळ्यात ही जीवनदायी औषधं कोण तयार करतो आणि कोण शोधून काढतात याचा विचार कोणी करत नाही. जर एखादी महामारी आली तर महामारीतून कसे बाहेर काढता येईल याकरिता डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, सर्व प्रशासकीय अधिकारी काम करतात.
फार्मासिस्ट ही अशी व्यक्ती आहे जी औषधं तयार करून रोगांचं निदान करण्यात डॉक्टरांना मदत करते. वैद्यकीय शास्त्रातील फार्मासिस्टच्या योगदानाचं कौतुक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी “जागतिक फार्मासिस्ट दिन” साजरा केला जातो.

जागतिक फार्मासिस्ट दिन २०२५ ची थीम “आरोग्याचा विचार करा आणि
फार्मासिस्टचा विचार करा” ही आहे. या थीमचा उद्देश फार्मासिस्ट हे केवळऔषध देणारे नसून आरोग्य व्यवस्थेतील अंत्यत महत्वाचे आधारस्थंभ आहेत. योग्य औषधोपचार, आजारांचीमाहिती, औषधांचे दुष्परिणाम टाळणे, लसीकरण, तसेच आरोग्याबाबत जनजागृती या सर्व क्षेत्रांत फार्मासिस्ट लोकासाठी अविरत कार्य करतात.

लोकांसाठी अविरत कार्य करतात. डॉक्टर आजाराचे निदान करतात, पण योग्य औषध योग्य मात्रेत आणि योग्य पद्धतीने रुग्णापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी फार्मासिस्टची असते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेत त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. म्हणूनच या थीमद्वारे आरोग्याचा विचार करताना सर्वप्रथम फार्मासिस्टची आठवण व्हावी आहे.
फार्मसिस्टच्या कशीसेवा देतातरुग्णालयात दाखल रुग्णांना वेळेत सर्व औषधी उपलब्ध करून देणे, आवश्यक अशी साधनसामग्री देणे, अत्यंत महत्त्वाचा असा ऑक्सिजन पुरवठा करणे, औषधांची व सामग्रीची कमतरता भासल्यास इतर जिल्ह्यातून मागविणे यांसारखी विविध कामे ही फार्मासिस्ट करतात. रुग्णांना आपत्कालीन वेळेत रात्रीलासुद्धा फार्मसी उघडून औषधी देण्याचे काम फार्मासिस्ट करतात.

औषधांचा अतिरेक किंवा अपूर्ण कोर्स करू नका. औषधांचे दुष्परिणाम किंवा शंका असल्यास फार्मासिस्टकडे नक्की विचारा. योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे औषधाइतकंच महत्त्वाचं आहे. -पुनम बांगरे मूल, फार्मासिस्ट