11th Student Admission Update:विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया २६ मे २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता सुरू होईल

62

11th Student Admission Update: विद्यार्थ्यासाठी महत्त्वाची बातमी! 11 वी प्रवेशासाठी नवं वेळापत्रक जाहीर होणार
11th Student Admission: अकरावीच्या प्रवेशाचे नवीन वेळापत्रक आज प्रकाशित अकरावी ऑन लाइन प्रवेश प्रक्रिया 21 तारखेपासून सुरू होणार होती. मात्र पहिल्याच दिवशी प्रवेशासाठीची वेबसाईट क्रॅश (11th Admission Website Crash ) झाली.
वेबसाईटवर ‘साईट अंडर मेंटेनन्स’चा मेसेज येत होता. वेबसाईट उघडत नसल्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले. दिवसभर हा गोंधळ सुरू होता. आज (गुरुवारी) सुधारीत वेळापत्रक प्रकाशित होणार असल्याचे समजते. आता आज प्रवेशासाठी कोणती तारीख जाहीर होते, याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळ व संपर्क:
www.mahafyjcadmissions.insupport@mahafyjcadmissions.in
महत्त्वाच्या सूचना:
प्रवेश नोंदणी शुल्क फक्त डिजिटल माध्यमातूनच स्वीकारली जाणार आहे. एकदा प्रवेश घेतल्यानंतर तो प्रवेश अंतिम मानला जाईल.
CAP, इन-हाऊस आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेशासाठी प्रत्येक फेरीपूर्वी “Consent” अनिवार्य आहे
प्रवेश वेळापत्रकाचे काटेकोर पालन आवश्यक आहे.
व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोट्यांत प्रवेश प्रक्रिया 6 जूनपासून सुरू होणार आहे. 
सुलभ आणि पारदर्शक प्रवेशाची प्रक्रिया
दहावीच्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा निर्णय खूपच दिलासादायक आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल. त्याचबरोबर अनधिकृत संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन बोर्डाने केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल.