Home आपला जिल्हा Breaking News सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे आजी माजी विद्यार्थी व पालकांचा स्नेहमिलन...

सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे आजी माजी विद्यार्थी व पालकांचा स्नेहमिलन सोहळा नाम. सुधिर मुनगंटीवार यांची उपस्थिती

67

मूल/ तालुका प्रतिनिधी
विद्या प्रसारण मंडळ मूल द्वारा संचालित सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल च्या वतीने आजी माजी विद्यार्थी व पालकांचा स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन २९ सप्टेंबर २०२४ रोज रविवारला दुपारी १२.३० वाजता भाग्यरेखा सभागृह मूल येथे करण्यात आले आहे. या सोहळ्याला विशेष उपस्थिती राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्सयव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री नाम. सुधिर मुनगंटीवार यांची राहणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्याच्या वतीने इको पार्क ते भाग्यरेखा सभागृह मूल पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून यावेळी सन १९९१ पासुन या शाळेत शिक्षण घेवुन विविध पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी यावेळी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. या प्रसंगी माजी विद्यार्थ्याचा नाम.मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवुन सत्कार केला जाणार आहे. शाळेत कार्यरत असलेल्या सर्व समित्यांच्या वतीने नाम.मुनगंटीवार यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्याच्या गुण गौरव सोहळ्याला सर्व माजी पालक व विद्यार्थ्यानी उपस्थित राहावे असे आवाहन सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलचे मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी केले आहे.