Home आपला जिल्हा Breaking News जानाळा नियतक्षेत्र मधील क क्रं 717@अखेर ती नरभक्षक वाघीण जेरबंद

जानाळा नियतक्षेत्र मधील क क्रं 717@अखेर ती नरभक्षक वाघीण जेरबंद

144

मागील काही दिवसांपासून मूल तालुक्यातील अनेक माणसांना ठार करणारी

 T83 tigress  मादी वाघीण चिचपल्ली परीक्षेत्रातील जानाळा नियतक्षेत्र मधील क क्रं 717  मधे आज रोजी सकाळी ५:३०वा. जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले.

दोन वाघांपैकी मादी वाघ जेरबंद करण्यात यश आले असून नर वाघावर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

हे वाघ पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ड्रोनचा व कॅमेऱ्याचा वापर केला आहे. मागील आठवड्यात शासनाने वाघांचे वाढते हल्ले लक्षात घेता त्यांना जेरबंद करणे आवश्यक वाटल्यामुळे वनविभागाला ड्रोन पुरवीले होते ,त्या ड्रोनच्या सहाय्याने वाघांची ओळख पटवून त्यांना जेरबंद करण्यासाठी सापळे लावण्यात आले होते मात्र जवळ जाऊन वाघ हुलकावणी देत होते शेवटी वाघांची स्थळ निश्चिती करुन त्यांना जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.