चंद्रपूर : शासनाने रोजगार हमीयोजनेच्या कामासाठी बँकेत संबंधित मजुराच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असणे आवश्यक केले आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेचे काम हवे असल्यास मजुरांना बँकेत पुन्हा ई-केवायसी करणे आवश्यक आहे. तेव्हाच संबंधित मजुरांना काम मिळेल अन्यथा त्यांना कामापासून मुकावे लागेल.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश मजुरांची ई-केवायसी झाली नसल्याचे रोहयो यंत्रणेद्वारे रोजगार सेवकामार्फतगावागावागतकळविण्यात आले आहे. यापूर्वी याच मजुरांना त्याच बँक खात्यावर पैसेसुद्धा जमा व्हायचे. आता काही मजुरांचे आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी मिसमॅच दाखवित असल्याने त्यांना पुन्हा ई-केवायसी करावी लागेल. ज्या मजुरांची ही समस्या असेल अशांना आता बँकेत जाऊन ई-केवायसी करावी लागणार आहे.
अनेक ग्रामपंचायत स्तरावर ई- केवायसी न केलेल्या मजुरांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे मजुरांनी तत्काळ ई-केवायसी करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना कामापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.
केवायसीची पोच पावती घ्यावी लागणारई-केवायसी करण्यासाठी संबंधित बँकेचा केवायसी फार्म, आधार कार्डची झेरॉक्स, पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्रे लागतील. बँकेतकेवायसीनंतर यात्री पोच पावती घ्यावी लागेल अन्यथ रोटयो






