Home आपला जिल्हा Breaking News बामणीमाल येथील वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

बामणीमाल येथील वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

143

आज दिनांक ४/०५/२०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता शिवनी परिक्षेत्रातील कुकडहेटी उपक्षेत्रातील पेटगाव बीटात कक्ष क्रमांक ३२२ मध्ये मौजा बामणीमाल येथील तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या सौ. दीपा दिलीप गेडाम या ३३ वर्षीय महिलेला दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केले  मौक्यावर तात्काळ पोहचून पंचनामा व इतर प्रक्रिया पार पाडली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवनी  विदेशकुमार गलगट क्षेत्रसहाय्यक श्री एस वाय बुले क्षेत्र सहाय्यक नल्लेश्वर श्री पेंदोर क्षेत्र सहायक शिवनी श्री प्रधान वन रक्षक श्री मडावी , श्री कोवे, श्री शेख,श्री भारत मडावी ,कु सवसाकडे इत्यादी कर्मचारी वन मजूर व पि आर टी सदस्य हजर होते, याप्रसंगी  तातडीची मदत म्हणून ५००००/-रुपये मृतक महिलेच्या पती ला दिले…