Home आपला जिल्हा Breaking News विद्यार्थ्यांची कर्करोगग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत

विद्यार्थ्यांची कर्करोगग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत

104

सेंट अॅन्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची कर्करोगग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत
मूल : आजच्या धावपळीच्या युगात अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. या आजारांचे पैशाअभावी निराकरण होत नाही. पैशाची जुळवाजुळव करताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते आणि पैशाअभावी कधीकधी जिवाला मुकावे लागते. अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अनेक सामाजिक संस्था मदतीकरिता पुढाकार घेत असतात.
कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत करणारी अशीच एक नामांकित संस्था पराकाष्ठा फाउंडेशन लखनौच्या माध्यमातून सेंट अॅन्स हायस्कूल मूलच्या मुख्याध्यापिका रेव्ह.सि. शॅलेट सेबॅस्टियन यांच्या मार्गदर्शनाखाली २४ फेब्रुवारीला शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी गोळा केलेले १ लक्ष १० हजार ६४० रुपये मदत म्हणन देण्यात आले. पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी ही रक्कम गोळा केली. शाळेच्या वतीने व्यवस्थापिका रेव्ह. सि. लिली सेबॅस्टियन यांचेद्वारा पराकाष्ठा फाउंडेशनचे प्रकाश देशमुख पांडे यांना ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. सर्वात जास्त रक्कम गोळा करणारे वर्ग पहिली ते नववीचे विद्यार्थी अन्विती घोंगे, शरयू माहुरपवार, अरीना मिस्त्री, अनन्या कुंभरे, राज येरोजवार, श्लोक रायकंटीवार, तन्मय नामपल्लीवार, स्मित रामटेके व क्रिती निमगडे यांना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले. सूत्रसंचालन अमोल कामिडवार यांनी तर आभार विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस कोकाटेने मानले. आर्थिक मदत करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका रेव्ह.सि. शॅलेट सेबस्टियन, शिक्षक व पालकांनी खूप कौतक केले.