Home आपला जिल्हा Breaking News 12 वी पास उमेदवारांसाठी मेगाभरती!! महावितरणमध्ये 5347 पदांवर भरती सुरु

12 वी पास उमेदवारांसाठी मेगाभरती!! महावितरणमध्ये 5347 पदांवर भरती सुरु

172

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahavitaran Recruitment 2024) अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विद्युत सहाय्यक पदांच्या तब्बल 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

12 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मानधन देण्यात येणार आहे.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (Mahavitaran Recruitment 2024) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. तब्बल 5347 जागांवर ही भरती होत असून जास्तीत जास्त उमेदवारांना इथे नोकरीची संधी मिळणार आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
भरले जाणारे पद – विद्युत सहाय्यक
पद संख्या – 5347 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मार्च २०२४
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे
परीक्षा फी – (Mahavitaran Recruitment 2024)
1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
2. मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

भरतीचा तपशील –

संवर्ग प्रवर्ग पद संख्या
1. विद्युत सहाय्यक अनुसूचित जाती 673
अनुसूचित जमाती 491
विमुक्त जाती (अ) 150
भटक्या जाती (ब) 145
भटक्या जाती (क) 196
भटक्या जाती (ड) 108
विशेष मागास प्रवर्ग 108
इतर मागास प्रवर्ग 895
ईडब्ल्यूएस 500
अराखीव 2081
एकूण 5347

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mahavitaran Recruitment 2024)

पद शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण (Mahavitaran Recruitment 2024)

मिळणारे वेतन –

पद वेतन
विद्युत सहाय्यक प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-

काही महत्वाच्या तारखा –

1. महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अधिसूचना प्रकाशित झाल्याची तारीख 29 डिसेंबर 2023
2. महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 01 मार्च 2024
3. महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/