Home आपला जिल्हा Breaking News प्रा. किरण कापगते यांची मागणी पूर्ण, सुधीरभाऊंचा केला महिलांनी सत्कार

प्रा. किरण कापगते यांची मागणी पूर्ण, सुधीरभाऊंचा केला महिलांनी सत्कार

94

मुल शहरातील नवनिर्मित शॉपिंग कॉम्प्लेक्स ला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तर भाजी बाजार परिसराला महात्मा फुलेंच नाव

मुल शहरात नवनिर्मित शॉपिंग कॉम्पलेक्स व भाजी बाजार परिसराला अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची नाव देण्याची मागणी प्रा डॉ सौ किरण कापगते यांच्या नेतृत्वात शहरातील महिलांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एका पत्रकान्वये केली होती, सदर मागणीची तात्काळ दखल घेत नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी योग्य ठरवत संबंधित अधिकारी वर्गाला सदर नाव संबंधित इमारतींना देण्याच्या सूचना केल्या, 26 जानेवारी 2024 ला शॉपिंग कॉम्पलेक्स , बाजार परिसर, वाल्मिकी गेट व शहिद स्मारकाचे लोकार्पण नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले , यात मागणी केलेल्या नवनिर्मित इमारतींना मागणी केल्या नुसार महापुरुषांची नावे देण्याची मागणी पूर्ण केल्याने प्रा किरण कापगते व इतर महिलांनी 26 जानेवारी ला झालेल्या जाहीर सभेत नामदार सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करीत त्यांचे आभार मानले, सदर कार्यक्रमात माजी जीप अध्यक्ष देवराव भोंगळे, संध्याताई गुरनुले, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, सौ रत्नमाला भोयर, प्रभाकर भोयर, नंदकिशोर रणदिवे व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती, प्रा किरण कापगते, रजनी कवाडकर, सुचिता बुकावार,सपना मारकवार. सेल सिंग. रेखाताई शर्मा. सिंधू यटलावार. संगीताताई जाधव. रूपा वाढई. प्रीती वाढई. मिराबाई तिमाडे. संगीता बेले. सुनिता डंबारे कल्पना लाडवे. मनीषा करनेवार. निशा बालवार सीमा नंदगिरीवार. पपीता जम्बुलवार. श्रद्धा मयुरी कांबळे चेतना भोयर नंदा रेड्डीवार. रजनीताई शेरकी. कीर्ती मोकाशी. कमलताई अलगुणवार. कल्पना कांबळे, श्रद्धा रायकठीवार व महिला उपस्थित होत्या