रेतीची वाहतुक करीत असताना तहसिल कार्यालयाने ट्रॅक्टर पडकल्याने ती सोडविण्यासाठी रक्कमेची जुडवा जुडव करण्यासाठी करणाऱ्या इसमाचा दुचाकी अपघातात निधन झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजता दरम्यान घडली. राजू भाऊराव भेंडारे (३८) रा.चिंचाळा असे मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे तर दुसरा दशरथ दिलीप जेंगटे (२९)गंभीर जखमी झाला आहे. जखमीला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. चार दिवसापूर्वी तहसील कार्यालयातील तहसिल कार्यालयाने रेती भरलेली ट्रॅक्टर पकडली होती. ती ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. शासन निर्णयाप्रमाणे ट्रॅक्टर सोडविण्याकरिता एक लाख २५ हजाराचा दंड आकारण्यात आला. एवढी मोठी रक्कम देणे राजूला शक्य झाले नाही. ट्रॅक्टर सोडविण्याकरिता एक लाख २५ हजार रुपये दंडाची रक्कम जुळवाजुळव करण्याकरिता तो मित्रांकडे नातेवाईकांकडे फेर्या मारीत होता. अशाच एका नातेवाईकाकडे पैसे आणण्याकरिता जात असताना नागाळा नजीक राजू चा अपघात झाला आणि त्यात तो दुर्दैवाने मृत पावला. राजू भेंडारे सोबत आणखी एक त्याचा साथीदार होता, तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे. राजू भेंडारे यांना दोन अपत्य असून घरची शेती विकून त्यांनी ट्रॅक्टर घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपास मूल पोलिस करीत आहे.
Home आपला जिल्हा Breaking News रक्कमेची जुडवा जुडव करण्यासाठी करणाऱ्या इसमाचा दुचाकी अपघातात निधन,एक साथीदार गंभीर जखमी






