Home आपला जिल्हा Breaking News नांदगाव येथे आधार शिबीराच आयोजन

नांदगाव येथे आधार शिबीराच आयोजन

97

नांदगाव येथे आधार शिबीराच आयोजन तहसील कार्यालयातील आधार केंन्द्र मूल व ग्रामपंचायत कार्यालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आधार शिबीराचा लाभ एकाच छताखाली मिळावा यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नांदगाव ग्रामपंचायत येथे येत आहे, दिनांक 13 जानेवारी ला कॅम्प होणार आहे.अनेक कागदपत्रांसाठी आधार अपडेट करणे आवश्यक आहे.

युआयडीएआयनं (UIDAI) नागरिकांनी आधारमध्ये दिलेली माहिती पुन्हा व्हेरिफाय करण्यासाठी ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करण्याचं आवाहन केलंय. दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपूर्वी ज्यांना आधार जारी करण्यात आलंय आणि त्यानंतर ते अपडेट झालं नाही त्यांना ते अपडेट करण्यासंदर्भातही मेसेज करण्यात आलेत.

आधार डेटा अपडेट का ठेवावा?
UIDAI त्या लोकांना त्यांचे आधार अपडेट करण्याचा सल्ला देत आहे, ज्यांनी गेल्या १० वर्षांत असे केले नाही. आधारशी संबंधित फसवणुकीला आळा घालण्यासाठी हे केले जात आहे. UIDAI ने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की लोकसंख्याशास्त्रीय माहितीच्या सतत अचूकतेसाठी कृपया तुमचे आधार अपडेट करा. ऑनलाइन अपडेट करता येणाऱ्या माहितीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, फोन नंबर आणि ईमेल आयडी यांचा समावेश आहे. फोटो, रेटिना किंवा इतर बायोमेट्रिक माहिती देखील अपडेट केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला आधार केंद्रात प्रत्यक्ष जावे लागेल.

आधार अद्ययावतीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 14 जानेवारीपर्यंत चालणार आहे. ज्यांनी आजपर्यंत आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांनी आपले आधार कार्ड लवकर अपडेट करून घ्यावे, असे आवाहन नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना करण्यात येते.

बँक, खाते किंवा जन्म-मृत्यू, आयुष्मान कार्ड यासह सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी आधार अपडेट करणे आवश्यक आहे. तहसील कार्यालय आधार केंन्द्र मूल मार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या शिबिरांमध्ये नागरिकांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.