Home आपला जिल्हा Breaking News पावसाची दमदार सुरुवात, बळीराजा सुखावला.

पावसाची दमदार सुरुवात, बळीराजा सुखावला.

92

मुल(प्रती)तालुक्यात सकाळपासून संततधार पाऊस पडत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची भात पेरणीची लगबग सुरू झाली आहे.यावर्षी पाऊस बराच लांबल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होता. दुबार पेरणीचे संकट त्याच्यासमोर होते. मात्र, उशिरा का होईना पावसाने सुरुवात केल्याने
शेतकरी सुखावला आहे. तालुक्यासह ग्रामीण आदी परिसरात आजही पावसाची संततधार पाहायला
मिळत आहे.तालुक्यात पावसाची संततधार झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीकामाला सुरुवात केली आहे. विविध धानाच्या वाणांची लागवड करून शेतकरी उत्पन्न घेतात.येथील खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. भात पिकाच्या पेरणीची शेतकऱ्यांना
चिंता सतावत होती. अखेर रविवार सोमवार लापाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांची कामाची लगबग पाहायला मिळाली.शेतकऱ्यांची पूर्वीची ढवळ्या- पवळ्याची बैलजोडी व नांगर ही शेतीच परंपरागत साधने आता कालबाह्य होत असून, शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी परंपरागत तसेच पॉवर टिलर, ट्रॅक्टरच्या सहाय्याने भात पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे.

“पेरणीची वेळ जुनच्या पहिल्या आठवड्यात असते. यावर्षी पावसाला थोडा उशीर झाला आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी आता पाऊस समाधानकारक झाला आहे. लवकरच पेरणी करून शेतीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल.”श्री.सीताराम भांडेकर    शेतकरी, सुशी.