NHM गडचिरोली भरती 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, ने NHM गडचिरोली भरती 2023 जाहीर केली आहे. NHM गडचिरोली भरती 2023 ही सुपर स्पेशालिस्ट, तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा समुपदेशक, जिल्हा गुणवत्ता समन्वयक, वैद्यकीय अधिकारी- पीजी, वैद्यकीय अधिकारी- युनानी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, वित्त व लेखाधिकारी, तंत्रज्ञ, आणि आरोग्य सेवक पदांसाठी जाहीर झाली आहे. NHM गडचिरोली भरती 2023 मध्ये एकूण 80 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NHM गडचिरोली भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली येथे ” सुपर स्पेशालिस्ट, तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा समुपदेशक, जिल्हा गुणवत्ता समन्वयक, वैद्यकीय अधिकारी- पीजी, वैद्यकीय अधिकारी- युनानी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, वित्त व लेखाधिकारी, तंत्रज्ञ, आरोग्य सेवक” पदांच्या 80 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. Google Form Link च्या माध्यमातून Online स्वरूपात अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांच्या ईमेल वर Auto-Generated अर्जाची प्रत प्राप्त होईल. सदर अर्जाच्या प्रतीसह उमेदवारांनी त्यांचे सर्व आवश्यक कागदपत्राच्या स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रती (Self Attested Xerox Copy) जोडून सदर अर्ज दिनांक ०५/०६/२०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ( कार्यालयीन कामकाजाचे दिवशी) “कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी – २ ( स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली” या पत्यावर बंद लिफाफामध्ये ( त्यावर पदाचे नांव व प्रवर्ग स्पष्टपणे नमुद करुन ) समक्ष अथवा नोंदणीकृत डाकेने सादर करावेत.







