मुंबई : विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून ती सादर करावी लागतात, त्यातच आपले सरकार या संकेतस्थळाचा सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. या सर्व स्थितीचा विचार करून २०२३- २०२४ च्या अकरावी प्रवेशासाठी उन्नत व प्रगत गटात आपण मोडत नसल्याचे स्पष्ट करणारे (नॉन-क्रिमीलेअर) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
या संबंधात राज्याच्या शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार सदर प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास, विद्यार्थ्यांकडून अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र भरून घेऊन प्रवेश देण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नॉन क्रिमीलेअर दाखला ऑनलाइन काढण्यासाठी ‘आपले सरकार’ची खालील वेबसाईट ओपन करा. https://aaplesarkar.mahaonlin e.gov.in/ हे संकेतस्थळ ओपन
झाल्यानंतर न्यू यूजर्स पर्यायावर क्लिक करा. मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा. नोंदणी (रजिस्ट्रेशन) झाल्यानंतर रजिस्टर मोबाइल क्रमांकावर युजर आयडी व पासवर्ड येईल, तो टाकल्यानंतर जिल्ह्याचे नाव टाका, त्याचबरोबर खाली आलेला कॅप्चा कोड टाका व लॉगिन करा. त्यानंतर आपले सरकारचे पेज ओपन होईल. त्या पेजवर उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषेचा पर्याय निवडा. त्यानंतर ‘महसूल विभाग’ हा पर्याय निवडा. त्यातील नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करा. ‘पुढे जा’ यावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावरील नॉन क्रिमीलेअर पर्यायावर क्लिक करा. यापुढे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे हा पर्याय येईल. या पर्यायात नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कशासाठी पाहिजे, याबाबत माहिती लिहायची. यामध्ये संपूर्ण माहिती ‘मला मंजूर’ या पर्यायावर क्लिक करायचे. शेवटी सेव्ह बटनवर क्लिक करायचे. त्यानंतर अर्ज नंबर मिळेल.
Home आपला जिल्हा Breaking News अकरावीच्या प्रवेशासाठी@नॉन-क्रिमीलेअर सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ






