Home आपला जिल्हा Breaking News मूल ग्रामसेवक संघटनेतर्फे आदर्श ग्रामसेवक,नवनियुक्त संचालकांचा सत्कार

मूल ग्रामसेवक संघटनेतर्फे आदर्श ग्रामसेवक,नवनियुक्त संचालकांचा सत्कार

121

मूल:आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक व चंद्रपूर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे नवनियुक्त संचालक यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम मूल ग्रामसेवक संघटनेतर्फे पंचायत समिती येथील सभागृहात १७ मे (बुधवार) दुपारी २ वाजता पार पडला.सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूल पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी अरुण चनफणे होते.गावात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करीत गावात विकासात्मक कामे करून ग्रामपंचायतीचे उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल नुकताच चंद्रपूर जिल्हा परिषदेतर्फे मूल तालुक्यातील कोसंबी,काटवन ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सूरज आकनपल्लीवार,जानाळा,हळदी धीरजकुमार बोरकर,बाबराळा, चकदूगाळा येथील ग्रामसेविका निराशा पाकमोडे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल तर चंद्रपूर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या झालेल्या निवडणुकीत कैलास फुलझले,मनीषा कुंभमवार निवडून आल्याने मूल ग्रामसेवक संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मूल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जीवन प्रधान,संजय पुपलवार,कृषी अधिकारी सुनील कारडवार,किशोर चौधरी,रामचंद्र देशमुख, गट शिक्षण अधिकारी वैभव खांडरे,आरोग्य विस्तार अधिकारी विनोद वैद्य,ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष उमेश आकुलवार,ग्रामविकास अधिकारी विजय यारेवार,शैलेश राजेंद्र येरमे,शैलेश साहारे सह सर्व ग्रामसेवक,पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते.