Home आपला जिल्हा Breaking News मुल नगर परिषदेकडून फेरीवाल्यांचे,पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण@5 वर्षे लोटूनही गेले अद्यापओळखपत्र मिळेना?

मुल नगर परिषदेकडून फेरीवाल्यांचे,पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण@5 वर्षे लोटूनही गेले अद्यापओळखपत्र मिळेना?

133

नगर परिषदेकडून फेरीवाल्यांचे सर्वेक्षण फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याच्या उद्देशाने नगर परिषदेकडून नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात  फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश व केंद्र सरकारच्या कायद्यानुसार मुल नगर परिषद राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करीत आहे. याअंतर्गत नगर परिषद क्षेत्रातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून ओळखपत्रांचे वितरण, शहरातील फेरीवाल्यांचा आराखडा, फेरीवाला क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास आदी बाबी अंतर्भूत आहेत. फेरीवाला धोरणाची प्रभावी व योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी शहर फेरीवाला समिती गठित केली आहे. 
फेरीवाल्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होवून फेरीवाल्यांना, पथविक्रेत्यांना ओळखपत्र दिले नाही . नोंदणी केलेल्या फेरीवाल्यांना कायद्यानुसार व्यवसाय करू दिले जाणार आहे. मात्र, यासाठी त्यांना ओळखपत्र व प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मुल  नगर परिषद क्षेत्रात आतापर्यंत  फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यापैकी  फेरीवाल्यांनी प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे नगर परिषदेकडे जमा केली आहेत. 

मुल नगरपरीषद अंतर्गत रोज पथविक्रेत्यांना कडून दर रोज 5 रूपये तिकीट वसूल करीत असतात रोज पथविक्रेता देतात परंतू त्यांना अजून पर्यंत स्वताच्या ओळखपत्र दिलेले नाही.मुल नगरपरीषद कडून पथविक्रेत्याना 10 ते 20 हजार कर्ज सुध्दा मिळालेले आहे

तरी मुख्याधिकारी साहेबांनी संबंधीत न.प.प्रशासन,प्रशासक,कर्मचारी लक्ष देवून पथविक्रेत्याना ओळखपत्र देण्यात यावे.अशी मागणी मुल वेंडर अॅक्ट ग्रुप मधून बहुउद्देशीय श्रमिक पथविक्रेते संघटना अध्यक्ष  अरुण खोब्रागडे मूल  हयांनी बोलून दाखविली आहे.