Home आपला जिल्हा Breaking News डॉ. आनंदराव कुळे यांना समाजसेवक अण्णा हजारे महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

डॉ. आनंदराव कुळे यांना समाजसेवक अण्णा हजारे महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

203

माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना. या नामांकित संघटना यांचे संयुक्त विध्यमाने दि. 5 मार्च 2023 ला स्थानिक कर्मविर दादासाहेब उपाख्य मा. सा. कन्नमवार सभागृह जि. प. चंद्रपुर येथे सामाजीक, शैक्षणिक, पत्रकारीता तसेच राजकिय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे महाराष्ट्रातून विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. आयोजित कार्यकमाचे उदघाटक मान. रविंद्र शिंदे माजी अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा सि.डि.सी.सी. बँक चंद्रपुर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व ! प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. अविनाश सकुंडे, सदस्य अल्पसंख्याक आयोग भारत सरकार दिल्ली. प्रमुख पाहूणे मान. श्री. किशोरभाऊ जोरगेवार आमदार चंद्रपुर विजयकुमार खंडारे मराठी सिने अभिनेते सौ. जयश्रीताई सावर्डेकर राष्ट्रीय महिला अध्यक्षा मुंबई, सौ. शिल्पा प्रफुल बनपुरकर संपादक इंडिया 24 न्यूज तथा महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा, मुख्य आयोजक श्री. तुळशीराम जांभुळकर मुख्य संपादक न्यूज २४ इंडिया तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (माहिती अधिकार) राष्ट्रीय उपाध्यक्ष (आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ) मा. डॉ. कैलास दादा पठारे राष्ट्रीय अध्यक्ष पोलिस मित्र पुणे. या सर्वांच्या उपस्थितीत डॉ. आनंदराव कुळे मुल जिल्हा चंद्रपूर यांना समाजसेवक अण्णा हजारे महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेना या संघटनेचे मुल तालुकाध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीत आहेत.
निःस्वार्थी, अभ्यासू व सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी असलेले अष्टपैलू व्यक्तीमत्व डॉ. आनंदराव कुळे यांना नुकतेच महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.