Home आपला जिल्हा Breaking News बोर्ड परीक्षेचा गड सर, आता टेन्शन ‘सीईटी’चे@वैद्यकीय अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण आर्किटेक्ट

बोर्ड परीक्षेचा गड सर, आता टेन्शन ‘सीईटी’चे@वैद्यकीय अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण आर्किटेक्ट

175

शैक्षणिक करिअरची दिशा ठरणार आहे. सध्या बोर्ड परीक्षा संपत आल्याने व्यावसायिक शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रवेश परीक्षांच्या तयारीला वेग आला आहे. बोर्ड परीक्षेचा गड सर झाल्याने आता ‘सीईटी’शी स्पर्धा सुरू झाली आहे. ‘सीईटी’चे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. विद्यार्थी व पालकांमधून व्यावसायिक अभ्यासक्रम व महाविद्यालयाची चाचपणी सुरू झाली आहे.

शैक्षणिक करिअरसाठी बारावी बोर्ड परीक्षा महत्त्वाची पहिली पायरी आहे. बारावीतील गुणवत्तेवरच विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दिशा ठरणार आहेत. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण आर्किटेक्ट आदी अभ्यासक्रमांकडे कल वाढत आहे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी बँकिंग व लेखापरीक्षण क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम व कोर्सेससाठी आग्रही
असतात. या सर्वच अभ्यासक्रमांना राज्य सामाईक परीक्षा ‘सीईटी’ द्यावी लागते. ‘सीईटी’तील गुणवत्तेवरच या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. सध्या बारावी बोर्ड परीक्षा संपली आहे. बहुतांश
विद्यार्थ्यांचा बोर्ड परीक्षेचा गड सर झाला आहे.

अशा विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा आता प्रवेश परीक्षांकडे वळविला आहे. ७ मार्चपासून सीईटी नीट परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे.

Online registration & Confirmation of Application Form on website 08/03/2023 to 07/04/2023

  • एमएचटी-सीईटी-२०२३ ऑनलाईन परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एच.एस.सी. किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा १२वी/समकक्ष परीक्षा दिलेली असावी.

  • संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.

  • दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

  • एमएचटी-सीईटी-२०२३ शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.८००/-

  • महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग / महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग उमेदवार) रु. ६००/-

  • उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.

  • ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे. एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.

  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.

  • कृपया आपला आप्लिकेशन नंबर , पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही देऊ नका.

  • कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र चांगल्या प्रतीचे अपलोड करा.

  • उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन सूचनाकरिता www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळा ला भेट द्यावी.