Home आपला जिल्हा Breaking News बी. एड. प्रवेशास मुदतवाढ

बी. एड. प्रवेशास मुदतवाढ

220

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बी. एड. प्रवेशप्रक्रियेची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या नाशिक येथील बी. एड. महाविद्यालयात सामाईक प्रवेश प्रक्रियेच्या मोफत मार्गदर्शनास सुरुवात झाली आहे.

Online Registration and confirmation of application form on website date has been extended till 27/03/2023. 

ज्या विद्यार्थ्यांना २०22-23 या शैक्षणिक वर्षात दोन वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारची सीईटी बीएड प्रवेश सामाईक परीक्षा देणे अनिवार्य असते. सीईटी परीक्षेशिवाय बीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेताच येत नाही. म्हणून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खास मविप्रच्या अनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सीईटी परीक्षेच्या मोफत ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची

  1. उमेदवाराने पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा बसणे (appear )आवश्यक आहे.

  2. माहितीपुस्तीकेतील सूचना अवगत असूनही उमेदवाराने अर्ज केला असेल तर त्यांनी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही अथवा इतर कोणत्याही अभ्यासक्रमाच्या सीईटीमध्ये समायोजित होणार नाहीत.

  3. संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.

  4. दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

  5. शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.८००/-

  6. महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग) रु. ६००/-

  7. उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.

  8. ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे.

  9. एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.

  10. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.

  11. भरलेल्या आणि शेवटी सादर केलेल्या माहितीसाठी उमेदवार जबाबदार आहेत.

  12. कृपया आपला आप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही देऊ नका.

  13. कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र चांगल्या प्रतीचे अपलोड करा.

  14. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन सूचनाकरिता https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळा ला भेट द्यावी.

  15. एका अर्ज फॉर्मसाठी उमेदवार फक्त एक मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वापरू शकतो.

  16. ज्या उमेदवारांनी आपले शालांत परीक्षेपासूनचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले आहे अशा उमेदवारांनी बी.एड सीईटीसोबत इंग्रजी विषय ज्ञान चाचणीस (ELCT) अर्जात होकार दयावा.

  17. एकदा ऑनलाईन अर्ज सादरकेल्यावर इंग्रजी विषय ज्ञान चाचणीचा (ELCT) पर्यायात बदल करता येणार नाही याची अर्जदारांनी गांभीर्यपुर्वक नोंद घ्यावी.

  18. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सूचना व माहिती पुस्तिका वाचली आहे असे समजण्यात येईल

\Bबी. एड. प्रवेशप्रक्रिया महत्त्वाच्या तारखा :

– सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचा कालावधी :

Ongoing Events Click HERE for Entire Schedule
Activity Schedule
On Line Registration and Confirmation of Application Form for MAH-B.Ed. (General & Special) & B.Ed.-ELCT CET 2023. From Thursday, 09/03/2023
To Saturday, 18/03/2023
First Extension to Form filling. From Sunday, 19/03/2023
To Thursday, 23/03/2023
Second Extension to Form filling. From Friday, 24/03/2023
To Monday, 27/03/2023

Online Registration and confirmation of application form on website date has been extended till 27/03/2023.